महाबळेश्वर तालुक्यातील गोगावले येथे विषारी किडा चावल्याने दहा शाळकरी मुलांना रुग्णालयात दाखल केले आहे. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
गोगावले येथे कोयना शिक्षण प्रसारक मंडळाची शाळा आहे. या शाळेतील सहा मुली व चार मुलांना काल सायंकाळी सातच्या दरम्यान अभ्यास करत असताना विषारी किडा चावला. त्यानंतर थोडया वेळाने मुलांच्या अंगाला खाज सुटायला लागली. तेथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर थोडा वेळ त्यांना बरे वाटले, मात्र नंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाल्याने त्यांना सातारा येथील ‘सिव्हील हॉस्पीटल’मध्ये दाखल करण्यात आले. तोपर्यत त्यातील दोन मुली अत्यवस्थ झाल्या होत्या. या घटनेमुळे परिसरात काळजीचे वातावरण तयार झाले.आहे. हा परिसर दुर्गम व डोंगराळ भागात येत असल्याने या मुलींना कोणत्या प्रकारचा किडा चावला असेल याची माहिती मिळू शकली नाही. आरोग्य विभागाने या परिसराची पाहणी केली असून शाळा परिसरात कीटकनाशक फवारणी करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार अतुल म्हेत्रे व प्रांताधिकारी रवी खेबूडकर यांनी दिली. या मुला-मुलींची प्रकृती सुधारत असून दोन मुलींना असणारा धोका टळला आहे, असेही त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Sep 2014 रोजी प्रकाशित
विषारी किडा चावल्याने दहा शालेय मुले रुग्णालयात
महाबळेश्वर तालुक्यातील गोगावले येथे विषारी किडा चावल्याने दहा शाळकरी मुलांना रुग्णालयात दाखल केले आहे. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
First published on: 21-09-2014 at 02:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student hospital in wai