हर्षद कशाळकर

अलिबाग : निसर्गचक्रात स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असलेला गिधाड नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी कोकणात मोठय़ा प्रमाणावार आढळणारा हा पक्षी दुर्मीळ होत चालला आहे. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील चिरगाव येथे सिस्केप संस्था आणि वन विभागाच्या सहकार्याने गिधाड संवर्धन प्रकल्प राबविण्यात येत असून त्याचे आता सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.

moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
no international airport pune city marathi news
पुणे : उद्योगांना पूरक पायाभूत सुविधांची बोंब!
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

कोकणात १९९२ ते २००७ या काळात गिधाडांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे आढळले. वाढते शहरीकरण आणि कुपोषण ही यामागची प्रमुख कारणे होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशिया खंडात अत्यंत दुर्मीळ समजली जाणारी पांढऱ्या पाठीची गिधाडे कोकणात अजूनही आढळतात. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेऊन, सिस्केप संस्था आणि वन विभाग यांच्या सहकार्यातून म्हसळा तालुक्यातील चिरगाव जंगलात गिधाड संवर्धन प्रकल्प राबविला जात आहे.

कुपोषणामुळे दगावणाऱ्या गिधाडांचे संवर्धन करणे आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास वाढवणे हा या प्रकल्पामागचा मूळ उद्देश आहे. म्हसळा तालुक्यातील चिरगाव आणि श्रीवर्धन तालुक्यातील जासवली येथील जंगलात गिधाड संवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यातील चिरगाव येथील प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. पूर्वी ज्या परिसरात गिधाडांची एखाद-दुसरी घरटी दिसून येत होती. तिथे आज ३० ते ३५ घरटी आढळत आहेत. गिधाडांची परिसरातील संख्या ८० हून अधिक झाली आहे. तर श्रीवर्धन म्हसळय़ाच्या आसपासच्या परिसरातही गिधाडांची संख्या वाढीस लागली आहे. देशविदेशातील पक्षीनिरीक्षकांसाठी चिरगावचा गिधाड संवर्धन प्रकल्प महत्त्वाचे अभ्यास केंद्र ठरत आहे.

कुपोषण ही गिधांडांची संख्या कमी होण्यामागचे मूळ कारण होते. त्यामुळे कुपोषण रोखणे गरजेचे होते. पूर्वी गावाबाहेर मृत जनावरे टाकण्यासाठी ढोरटाकी असायची. मात्र ग्रामस्वच्छता अभियानाची सुरुवात झाल्यानंतर ढोर टाक्या बंद झाल्या. मृत जनावरांना पुरणे अनिवार्य झाले. त्यामुळे गिधाडांचे कुपोषण वाढले. गिधाडांची संख्या कमी होत गेली. हे लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गावात ढोरटाकी संकल्पना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्वच्छकाच्या भूमिकेत

ल्लमृत जनावरांच्या विघटनप्रक्रियेत गिधाड महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांना निसर्गाचे सफाई कामगार म्हणून ओळखले जाते, मात्र वाढत्या शहरीकरणामुळे गिधाडांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. आशिया खंडात प्रामुख्याने लांब चोचीची, बारीक चोचीची आणि पांढऱ्या पाठीची गिधाडे आढळत असत. यातील पांढऱ्या पाठीची गिधाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

ल्लकाही वर्षांपूर्वी पक्षी निरीक्षक प्रेमसागर मिस्त्री यांना म्हसळा तालुक्यातील

देहेन येथे गिधाडांची काही घरटी आढळून आली होती. मात्र त्यांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे स्थानिकांनी त्यांना सांगितले. यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिकांच्या मदतीने या परिसरात गिधाड संवर्धन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

गिधाड संवर्धनासाठी दरवर्षी शासन मोठा खर्च करते. हरयाणा, पश्चिम बंगाल आणि आसाम येथे गिधाड संवर्धन केंद्रे आहेत. पण गिधाडांचा नैसर्गिक अधिवास आढळणाऱ्या कोकणात मात्र गिधाड संवर्धनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे गिधाडांचा नैसर्गिक अधिवास वाढवला आणि कुपोषण दूर केले आणि स्थानिकांमध्ये जागृती केली तर सकारात्मक परिणाम दिसून येतील.

– प्रेमसागर मेस्त्री, प्रकल्प संचालक, सिस्कॅप, गिधाड संवर्धन प्रकल्प.