वनवासी कल्याण आश्रमाचे खोपोलीतील ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते सुधांशू गोगटे (६२) यांचे १९ नोव्हेंबर रोजी लौजी-खोपोली येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. येथील मस्को कंपनीमधील नोकरी सांभाळून सुधांशू गोगटे गेली ३० वर्षे कर्जत येथील वनवासी कल्याण आश्रम संचालित जांभिवली येथील आश्रम शाळेचा संपूर्ण कारभार पालकत्वाच्या भूमिकेतून पाहत होते. वनवासी कल्याण आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रसंगी पदरमोड करून, नि:स्वार्थ वृत्तीने व निष्ठेने अखेपर्यंत झटणाऱ्या सुधांशू गोगटे यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2012 रोजी प्रकाशित
वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते सुधांशू गोगटे यांचे निधन
वनवासी कल्याण आश्रमाचे खोपोलीतील ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते सुधांशू गोगटे (६२) यांचे १९ नोव्हेंबर रोजी लौजी-खोपोली येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले.
First published on: 22-11-2012 at 06:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhanshu gogte is dead of vanvasi kalyan ashram