लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पुण्यात पार पडली. महायुती म्हणून आमचे ४८ आमदार उभे राहणार आहेत अशी माहिती सुनील तटकरेंनी दिली. लोकसभा निवडणुकीत काय रणनीती असेल या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली. ज्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली. बुधवारीही या संदर्भात बैठक होणार आहे असंही सुनील तटकरेंनी सांगितलं.

काय म्हणाले अजित पवार?

आमची आमदारांची बैठक झाली. आम्ही एकत्र चर्चा करुन महायुतीच्या ४८ जागांबद्दल महाराष्ट्रात कुणी कुठे जागा लढवायच्या त्याचं ८० टक्के काम झालं आहे. आता मी सांगतो की ९९ टक्के जागावाटपाचं काम फायनल झालं आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी उमेदवार दिले आहेत. आज मी पहिली जागा जाहीर करतो आहे. रायगड लोकसभा मतदार संघातून सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार म्हणून लोकसभा लढवतील ही माहिती अजित पवार यांनी दिली. मुख्य पक्ष आणि घटक पक्ष मिळून ४८ जागा लढवत आहोत. शिवाजीराव अढळराव यांचा आज पक्ष प्रवेश होणार आहे. तो प्रवेश झाल्यानंतर दुसरी जागा मी तिथे जाहीर करेन. बाकी जागा २८ मार्चला तुम्हाला महायुतीच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Sunetra Pawar, Files Nomination, Baramati lok sabha seat, Ajit Pawar Announces Campaign Chiefs, mahayuti Campaign Chiefs for baramati, baramati campaign, lok sabha 2024, election 2024, baramati news, pune news, marathi news, politics news,
सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अजित पवार ॲक्शन मोडवर
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
Devendra Fadnavis said We have to work with those who have struggled so far
“आतापर्यंत संघर्ष केलेल्यांसोबत काम करावे लागेल”, देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; इंदापूरचे पालकत्व स्वीकारले
Assembly Speaker Rahul Narvekars letter to Chief Minister to Change the name of Alibaug
अलिबागचे नाव बदला, विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

उगाचच गैरसमज पसरवले गेले

पाच वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या तेव्हा लोकसभेच्या ४८ जागा होत्या. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस युतीत लढले आणि महाविकास आघाडी म्हणून लढलो होतो. कारण नसताना आम्हाला तीनच जागा मिळतील वगैरे गैरसमज पसरवले गेले. २३ आणि १८ जागा भाजपा आणि शिवसेनेने २०१९ ला जिंकल्या होत्या. त्यानंतर आमची चर्चा झाली आहे. अंतिम घोषणा आम्ही २८ मार्चला करणार आहोत आणि जागा जाहीर करणार आहोत. अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.