लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी आता पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसून इंडिया आघाडीतही जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे. दरम्यान, महायुतीत आता राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षही सामील होण्याची चर्चा आहे. दरम्यान, राज ठाकरेही दिल्लीत रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“२०१९ प्रमाणे एकत्र येऊन भाजपाविरोधात लढलो तर राज ठाकरेंबद्दलची आपुलकी वाढेल. ते धाडसी आणि लढणारे नेते आहेत”, असं रोहित पवार म्हणाले. “ईडी आणि विविध संस्थांना घाबरून एखादा नेता त्यांची भूमिका बदलत असेल तर योग्य नाही. आज लोकांना लढणारे नेते पाहिजेत. महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या वतीने महाशक्तीच्या विरोधात जो लढेल तो लोकांच्या मनात बसणार आहे. आज लढायची परिस्थिती असताना भाजपाबरोबर न जाता आपण एकत्र येऊन लढलं पाहिजे. तसंच महाराष्ट्राच्या बाजूने लढणं महत्त्वाचं आहे, असं आवाहनही रोहित पवारांनी केलं.

Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
second wife of an invalid marriage may not complain of harassment but of dowry
अवैध लग्नाची दुसरी पत्नी छ्ळाची नाही, पण हुंड्याची तक्रार करू शकते
Rohit Pawar reacts on crab case says I will not stop until I crush corrupt people
“भ्रष्टाचारी खेकड्याची नांगी ठेचणारच…”, खेकडा प्रकरणावर रोहित पवार यांचे भाष्य

ऑफर का दिली नाही

राज ठाकरेंनी भाजपात न जाता महाविकास आघाडीत यावं असं वाटतं तर त्यांना आधी ऑफर का दिली नाही? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता रोहित पवार म्हणाले, “ऑफर देणारा मी कोण आहे. माझं एकच मत आहे की त्यांनी पुढाकार घेऊन चर्चा करणं गरजेचं आहे. नेत्यांबरोबर चर्चा झाली असेल की नाही माहित नाही. झाली असेल तर ती चर्चा पुढे जायला हवी, असंही रोहित पवार म्हणाले.