प्रकरणातील प्रमुख सूत्रधार भास्कर वाघ यास विशेष न्यायालयाने बुधवारी एका खटल्यात १० वर्ष सक्तमजुरी व सहा लाख रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. इतर चौघांनाही शिक्षा ठोठावण्यात आली असून सात जणांची मुक्तता करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेतील कोटय़वधींच्या अपहारप्रकरणी न्यायालयात विविध खटले दाखल आहेत. हे प्रकरण राज्य अनेक वष्रे गाजले होत़े  त्याच्या दाखल असलेल्या खटल्यांपैकी एक कोटी ३८ लाख रूपयांच्या अपहार खटल्याचे कामकाज विशेष न्यायाधीश एम. एम. अग्रवाल यांच्यासमोर चालले. या खटल्यात दोषारोपपत्र दाखल असलेल्या २२ पैकी १० संशयितांचा निकाल लागण्याआधीच मृत्यू झाला आहे. विशेष सरकारी वकील संभाजीराव देवकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने वाघ यांसह इतरांना शिक्षा सुनावली. त्यात वसंत तुकाराम पवार यांना पाच वर्ष सक्तमजुरी व तीन लाख रूपये दंड, तत्कालीन शिपाई महेबुबखाँ महेताबखाँ पठाण यास दहा हजार रूपये दंड व तीन वर्ष शिक्षा, सुनील तुकाराम बोरोले व जगन्नाथ पवार यासही शिक्षा सुनावण्यात आली.