काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून अजूनही राजकीय गोंधळ सुरू आहेत. अशातच माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या आणि प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी वीर सावरकरांबाबत एक विधान केलं आहे. “सावरकर म्हणायचे की बलात्कार हे एक राजकीय हत्यार आहे, ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा”, असं वक्तव्य शिवानी वडेट्टीवार यांनी केलं.

नेमकं काय म्हणाल्या शिवानी वडेट्टीवार?

“हे लोक फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाही. ते सावरकर मोर्चा काढतात. मला आणि माझ्यासह इतर भगिनी महिलांना भीती वाटत असेल. सावरकर म्हणायचे बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. ते तुम्ही तुमच्या विरोधकांच्या विरोधात वापरलं पाहिजे. मग माझ्यासारख्या महिला-भगिनींना सुरक्षित कसं वाटेल? अशा लोकांच्या प्रचारासाठी हे लोक मोर्चा काढतात”, असं शिवानी वडेट्टीवार यांनी म्हटलं.

Pimpri- Chinchwad, Friend,
पिंपरी- चिंचवड: पत्नीला शिवीगाळ केल्याने मित्राची हत्या; गुंडा विरोधी पथकाने आरोपीला ठोकल्या बेड्या
Raj Thackeray Fatwa
राज ठाकरेंनी काढला फतवा! म्हणाले, “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो..”
gulabrao patil
“संजय राऊत ही गेलेली केस”, पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून गुलाबराव पाटलांची खोचक टीका; म्हणाले…
Punjab Sacrilege Case
श्री गुरू ग्रंथ साहिबच्या प्रतीचा अवमान केल्याच्या संशयावरून १९ वर्षीय तरुणाची हत्या, पंजाबमधील घटना
strict action against men for oppression of women says nirmala sitharaman
‘रेवण्णांवरील आरोपांबाबत विरोधकांचे राजकारण’; महिला अत्याचारांबाबत कठोर भूमिका : सीतारामन
Amravati, Murder husband ,
अमरावती : प्रेमप्रकरणात अडसर ठरत असलेल्या पतीची निर्घृण हत्या; पत्नीनेच रचला कट
dalit youth commits suicide after after stripping and beating in kopardi
कोपर्डीमध्ये दलित तरुणाची आत्महत्या; विवस्त्र करून मारहाणीनंतर टोकाचे पाऊल
sharad pawar on religion basis reservation
“धर्माच्या आधारावर आरक्षण आम्हाला मान्य नाही”; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मोदींनी स्वत:..”

हेही वाचा : “राहुल गांधींना महाराष्ट्रात येऊ न देणाऱ्याचा पायच…”, ठाकरे गटाचा बावनकुळेंना इशारा

यावर आता शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार राजन साळवी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “वीर सावरकरांचं देशासाठीचं योगदान सांगण्याची आवश्यकता नाही. वीर सावरकरांची ख्याती सर्वांना माहिती आहे. त्यामुळे वीर सावरकरांबद्दल कोणी, असं वक्तव्य केलं, असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. यासंबंधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भूमिका जाहीर करतील. त्याप्रमाणे लढाई लढू,” असं राजन साळवी म्हणाले.

हेही वाचा : अमल महाडिकांचे आव्हान, ऋतुराज पाटील दंड थोपटत बिंदू चौकात आले अन्…; कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं

“सावरकरांनी लिहिलेल्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातला संदर्भ…”

शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांनी सांगितलं, “हा विषय फार गंभीर आहे, असं मला वाटत नाही. शिवानीला विचारलं की हा कुठला संदर्भ घेऊन तू बोललीस. ती म्हणाली सावरकरांनी लिहिलेल्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातला तो संदर्भ आहे. या पुस्तकाचा आधार घेऊन बोलली असेल, तर त्यावर वाद होण्याचं काही कारण नाही. पण, मला माहिती नाही की ती कोणत्या संदर्भात बोलली आहे. ती स्वत: वकील आहे. त्यामुळे तिला वाचनाचाही मोठा छंद आहे. कुठल्यातरी पुस्तकाचा तिने संदर्भ घेतलाय, असं तिचं मत आहे. यावर ती अधिक बोलू शकेल,” असं विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं.