मुंबई गोवा महामार्गावर खासगी प्रवासी बस झाडाला धडकून बुधवारी पहाटे झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले, तर २२ प्रवासी जखमी झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील पळस गावाजवळ पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. 
अतूल तावडे, सुहास गोडे आणि संदीप राणे अशी मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावे आहेत. जखमींपैकी सहा जणांना मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले असून, अन्य जणांवर पेण आणि नागोठाणे येथे उपचार सुरू आहेत. पळस गावाजवळ चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जाऊन धडकली. त्यानंतर स्थानिक लोकांनी तातडीने जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
(संग्रहित छायाचित्र)