मालमोटार व क्रुझर जीप यांच्यात समोरासमोर धडक होऊन पाचजण ठार, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. उमरगा-आळंद मार्गावर खजुरी बॉर्डरजवळ शनिवारी सकाळी सातच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. अपघातातील सर्व मृत व जखमी कर्नाटकातील सेडम गावचे आहेत.
गुलबर्गा जिल्ह्यातील सेडम येथून आठ तरुण धूलिवंदनाच्या रात्री गोवा व महाराष्ट्रात पर्यटनासाठी क्रुझरने (केए ३९ एमएच २३६०)आले होते. सकाळी सहाच्या सुमारास उमरगा चौरस्ता येथे चहापान करून ते सेडमला जाण्यास निघाले. खजुरी बॉर्डरजवळ क्रुझर व गुलबग्र्याहून लातूरकडे निघालेल्या मालमोटारीची (एमएच २४ ए ३४५७) समोरासमोर धडक बसली. या अपघातात महंमद माजीद शालुवाले (वय २२), मौलाली हैदरसाब मुल्ला (वय २३, क्रुझर चालक), शेख शेरअली मकतुमअली शेख (वय २२) व अमिनोद्दीन बंदेआली शेलार (वय २२) हे चौघे जागीच ठार झाले. शेख मंजूर शेख रफिक (वय २०) याचा उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जगन्नाथ विठ्ठल ठगरे, एम. डी. बिलाल व महेबूब हामियोद्दीन शालुवाले हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ सोलापूरला पाठविण्यात आले.
अपघात एवढा भीषण होता की, क्रुझरचा समोरील भाग व स्टेअिरगचा चक्काचूर झाला. मालमोटारीची समोरील दोन्ही चाके रॉडसह मागे गेली. अपघातात मालमोटारीची दोन्ही चाके मागे जाऊन मालमोटार जागेवर, तर क्रुझर रस्त्याखाली खड्डय़ात जाऊन पडली. घटनास्थळी मयताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. अपघातप्रकरणी उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Mar 2014 रोजी प्रकाशित
मालमोटार-क्रुझरची धडक; कर्नाटकातील ५ तरुण ठार
मालमोटार व क्रुझर जीप यांच्यात समोरासमोर धडक होऊन पाचजण ठार, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. उमरगा-आळंद मार्गावर खजुरी बॉर्डरजवळ शनिवारी सकाळी सातच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली.
First published on: 23-03-2014 at 01:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Truck cruzer accident five youth death