लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : महापालिकेच्या आढावा बैठकीस विलंब केल्या बद्दल दोन अधिकार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त तथा अतिरियत आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सोमवारी दिले. वेळेचे सर्वानी भान ठेवावे यासाठी यावेळी पाचशे रूपयांचा दंड प्रतिकात्मक आकारण्यात आला असून यापुढे विलंब झाल्यास कारवाई अटळ असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

महापालिकेच्या सर्व विभागाची आढावा बैठक आज बोलावण्यात आली होती. यो बैठकीच्या नियोजित वेळेत महापालिकेचे २२ पैकी २० अधिकारी हजर होते. मात्र, दोन अधिकारी कोणतीही पूर्व सूचना न देता विलंबाने आल्याचे लक्षात येताच अतिरिक्त आयुक्तांनी या दोन अधिकार्‍यांवर पाचशे रूपये दंडात्मक कारवाईचे आदेश आस्थापना विभागाला दिले.

आणखी वाचा-सोलापुरात रोहिणीचा पहिलाच २५ मिमी पाऊस; वादळाने वृक्ष कोसळले; फळबागांसह घरांचेही नुकसान

आढावा बैठकीत मान्सून पूर्व नाले सफाई , बांधकाम विभाग , आरोग्य विभाग , नगररचना विभागाकडील विषयावर चर्चा करण्यात आली आहे, बेकायदेशीर होर्डिंग कारवाई बाबत आढावा घेण्यात आला. महापालिका क्षेत्रातील ३१ होर्डिंग पैकी आज अखेर ५ होर्डिंग काढण्यात आले असल्याचे मालमत्ता विभागाकडून सांगण्यात आले त्या वर पुढील तीन दिवसात अन्य विभागाची मदत घेऊन सत्वर कारवाई पूर्ण करावी असे आदेश देण्यात आले.

महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारती बाबत देखील चर्चा करण्यात आली, यावेळी शासन निर्णय आणि कायद्याच्या कक्षेत राहून कारवाई करणे आवश्यक आहे, सहायक आयुक्त यांनी त्या बाबत खबरदारी घ्यावी, धोकादायक इमारत आणि बांधकाम पडण्याची कारवाई या पूर्वी मान्यता घेतलेल्या इमारती बाबत सत्वर चालू करावी अशी सूचना अतिरिक्त आयुक्तश्री. अडसूळ यांनी दिले, या कामी कोणत्याही परिस्थितीत हयगय अगर कसूर सहन केली जाणार नाही, या बाबत मा आयुक्त लवकरच आढावा घेणार आहेत, त्या पूर्वी दोन तीन दिवसात धोकादायक इमारती बाबत मान्सून पूर्व कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

आणखी वाचा-भुजबळांच्या ‘त्या’ विधानाला फडणवीसांचं उत्तर; म्हणाले, “भाजपा सर्वात मोठा पक्ष, त्यामुळे जास्त…”

धोकादायक इमारतीवर नागरिकांना सूचना फलक लवकरात लवकर लावणे बाबत या वेळी पुन्हा सूचना दिल्या आहेत, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत करावयाच्या उपाययोजना सत्वर करून घेण्याचा आहेत ,यावर बैठकीत चर्चा होऊन सूचना दिल्या आहेत, यावेळी उप आयुक्त श्रीमती शिल्पा दरेकर ,आणि खाते प्रमुख, अधिकारी उपस्थितीत होते.