उल्हासनगरमधील जीन्स कारखान्यात काम करणाऱ्या दोन तरुणांची अंबरनाथमधील वडोल गावाच्या हद्दीत गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.
राकेश विश्वकर्मा (वय २२), अमित धीरबलानी (वय २५) अशी मयतांची नावे आहेत. वडोल गावाजवळील वालधुनी नदीच्या पात्रात या तरुणांची मस्तके तरंगत होती. धड नदीबाहेर टाकण्यात आले होते. अपंग सेवा संघाचे अध्यक्ष भरत खरे सोमवारी सकाळी तेथून जात असताना त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. त्या वेळी रविवारी पहाटे उल्हासनगरमधील हिल लाइन पोलीस ठाण्यात दोन तरुण बेपत्ता असल्याची तक्रार या तरुणांच्या नातेवाईकांनी केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jan 2013 रोजी प्रकाशित
अंबरनाथमध्ये दोन तरुणांची निर्घृण हत्या
उल्हासनगरमधील जीन्स कारखान्यात काम करणाऱ्या दोन तरुणांची अंबरनाथमधील वडोल गावाच्या हद्दीत गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.
First published on: 01-01-2013 at 03:56 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two youth murdered in ambarnath