scorecardresearch

Premium

“भाजपाचं सरकार आणा अन् रामलल्लाचे मोफत दर्शन घ्या”, अमित शाहांच्या विधानावर उद्धव ठाकरे म्हणाले…

“येत्या निवडणुकीत जनतेला आवाहन करतो की…”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

uddhav thackeray amit shah
अमित शाहांनी मध्य प्रदेशात केलेल्या विधानावर उद्धव ठाकरे बोलले आहेत. ( संग्रहित छायाचित्र )

मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यास भाविकांना रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा खर्च भाजपा सरकार करेल, असं आश्वासन गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिलं होतं. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. ते ‘मातोश्री’ येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बजरंगबली की जय’ म्हणत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशात ‘रामल्लाचे दर्शन मोफत घडवू’ असं जाहीर केलं आहे. अमित शाहांनी फक्त मध्य प्रदेशपुरतं ही घोषणा करू नये. देशातील कानाकोपऱ्यात रामभक्त आहेत. त्या भक्तांना सोयीनुसार मोफत अयोध्या वारी करावावी.”

Rahul Narwekar
राहुल नार्वेकर आता लोकसभेत जाणार? खासदारकीच्या उमेदवारीबाबत स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “केंद्रात…”
Devendra Fadnavis on BJP Workers
‘भाजपाच्या ९० टक्के कार्यकर्त्यांना काहीच मिळणार नाही’, काँग्रेस नेत्यांच्या पक्षप्रवेशावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…
Mallikarjun Kharge
राज्यसभेतील मोदींच्या भाषणावर मल्लिकार्जुन खरगेंचं चोख प्रत्युत्तर; सांगितला NDA चा फुल फॉर्म!
devendra fadnavis chhagan bhujbal
छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी त्यांचा…”

हेही वाचा : अमित शाह म्हणाले ‘रामाचं मोफत दर्शन’, राज ठाकरेंचा टोला; “भाजपाने टूर्स अँड ट्रॅव्हल्स खातं…”

“२२ जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे. देशातील ५ ते १० कोटी लोक राम मंदिराच्या उद्घाटनासाठी भाजपा आणू शकते. तेव्हा, भक्तांना अयोध्येत आणून मोफत दर्शन घडवल्याचं सांगतील. पण, तसं नाही. रामलल्लाचे दर्शन राम भक्तांना वाटेल, तेव्हा घडवून दिलं पाहिजे,” अशी मागणी उद्धव ठाकरेंनी भाजपाकडे केली आहे.

हेही वाचा : “भाजपाला फ्री हिट आणि आमची हिट विकेट”, उद्धव ठाकरेंचं क्रिकेटच्या भाषेत आयोगावर टीकास्र!

“पंतप्रधान ज्याअर्थी ‘बजरंगबली की जय’ म्हणत मतदानाचं बटण दाबण्याचं आवाहन करतात. त्याप्रमाणेच आम्ही देखील येत्या निवडणुकीत जनतेला आवाहन करतो की, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर हर महादेव,’ ‘जय श्रीराम’ बोलून मतदान करा. राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळो म्हणून ‘गणपती बाप्पा मोरया’ बोलून मतदान करा,” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray on amit shah free ram mandir darshan in madhya pradesh election ssa

First published on: 16-11-2023 at 14:04 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×