बारसू प्रकल्पाबद्दलचे माझे पत्र नाचवत आहात. मग, माझ्याच काळातील वेदांन्ता फॉक्सकॉन, एअर बसचा प्रकल्प गुजरातला का दिला? बल्क ड्रग पार्कचा प्रकल्पही मार्गी लावावा. चांगले प्रकल्प गुजरातला द्यायचे. म्हणजे महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी द्यायची, अशी टीका शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

“कोकणातील रिफायनरी प्रकल्प गुजरातला द्या आणि वेदांन्ता फॉक्सकॉन, गिफ्ट सिटी महाराष्ट्रात आणा. मोठ्या आस्थापनांची कार्यालये दिल्ली नेण्यात आली. ती मुंबईला द्या. चांगल्या गोष्टी गुजरात आणि दिल्लीला नेल्या. विनाशकारी आणि विवादास्पद प्रकल्प कसे लादू शकता,” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. बारसूतील आंदोलकांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
nashik, Fraud Case Registered Against Panjarpol , Nashik Panjarpol Sanstha Managers, Forged Letter, Allegedly Signed by Chief Minister, land acquisition panjrapole nashik, panjrapole nashik fraud, forged letter cm eknath shinde,
भूसंपादन प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे बनावटपत्र, श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा

हेही वाचा : बारसू रिफायनरी प्रकल्पावरून भास्कर जाधव अखेर बोलले; म्हणाले, “थेट १ लाख नोकऱ्या…”

स्थानिक आमदार राजन साळवी बारसूतील प्रकल्पाचं ८ दिवसांपूर्वी समर्थन करत होते. आता त्यांची भूमिका बदलली आहे? असा प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “आमच्या सर्वांची भूमिका एकच आहे आणि होती. जर प्रकल्प चांगला असेल आणि गावकऱ्यांचा विरोध नसता, तर आम्ही मध्ये येण्याचं कारण नव्हतं. पण, ज्या पद्धतीने दडपशाही सुरू आहे, म्हणजे काहीतरी काळभेर आहे. ही दडपशाही पाहिल्यानंतर राजन साळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तुम्ही आम्हाला फसवत आहात. पर्यावरणाची हानी करून हा प्रकल्प आम्हाला नको,” असं उद्धव ठाकरे सांगितलं.

हेही वाचा : “हुकूमशाहीने प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू”, राजापूरमध्ये उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर घणाघात!

प्रकल्पासाठी जनमत चाचणी घेण्यात यावी का? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी म्हटलं, “जनमत चाचणी घेण्यापेक्षा लोकांसमोर जायला पाहिजे. मी पत्र दिलं होतं, तर लोकांसमोर जाऊन उभं का राहिलो? एवढं धाडस सरकारने करावं. पण, उपऱ्यांची सुपारी घेऊन माझ्या भूमिपुत्रांच्या घरावर वरवंटा का फिरवत आहात?,” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.