पूर्वीच्या निवडणुकांचा इतिहास बघितला तर वंचित बहुजन आघाडीने ‘छुपा रुस्तम’ म्हणून काम केलं आहे. मतांचं गणित बिघडवण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले, अशी टीका महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केली होती. या टीकेला आता वंचित बहुजन आघाडीने प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “नरेंद्र मोदी हे ‘मौत का सौदागर’, त्यांनी करोना काळात…”; प्रकाश आंबेडकरांचं टीकास्र!

तुषार गांधी नेमकं काय म्हणाले होते?

आज तुषार गांधी यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना वंचित बहुजन आघाडीवर जोरदार टीका केली होती. “पूर्वीच्या निवडणुकांचा इतिहास बघितला तर वंचित बहुजन आघाडीने ‘छुपा रुस्तम’ म्हणून काम केलं आहे. मतांचं गणित बिघडवण्यासाठीच त्यांनी अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले. या निवडणुकीत महाविकास आघाडीने त्यांना पर्याय दिला होता. ते इंडिया आघाडीत येऊ शकले असते. त्यांनी व्यावहारिक मागणी केली असती, तर इंडिया आघाडीनेही त्यांना घेतलं असतं. पण ते ठरवूनच आले होते. त्यांना जबाबदारी दिली होती. आणि त्यांनी त्यांचे काम पूर्ण केलं”, असे ते म्हणाले होते.

याबरोबरच “एखाद्या जागेवर तुम्हाला मतं किती मिळतात आणि तुम्ही किती नुकसान करता, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे महाविकास आघाडीत घेताना वंचित बहुजन आघाडीवर अन्याय झाला असं म्हणता येणार नाही. त्यांची जी क्षमता होती, त्यानुसार त्यांना जागा देण्याचे आश्वासन देण्यात आलं होते”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती.

Swati Maliwal Assualt Case : बिभव कुमार यांना अटक झाल्यानंतर अरविंद केजरीवालांचं मोदींना थेट आव्हान; म्हणाले, “उद्या दुपारी १२ वाजता…”

वंचित बहुजन आघाडीने काय म्हटलंय?

दरम्यान, तुषार गांधींच्या या टीकेला आता वंचित बहुजन आघाडीने प्रत्युत्तर दिलं आहे. “ ”तुषार गांधींनी वंचित बहुजन आघाडीचं केलेलं विश्लेषण आम्ही ऐकलंय. त्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही. त्यांच्या पणजोबांसारख्याच त्यांच्याही जातीय भावना आहेत. महात्मा गांधींना वंचित वर्गासाठी (आताच्या अनुसूचित जातीसाठी) स्वतंत्र मतदार नको होते. आता त्यांचे पणतू तुषार गांधी यांनाही वंचित आणि बहुजनांच्या पक्षाने निवडणूक लढवावी आणि त्यांच्या जवळही स्वतंत्र राजकीय विचार आणि नेतृत्व असावे, असे वाटत नाहीये. महात्मा गांधींना याचा नक्कीच अभिमान वाटत असेल की, त्यांचा पणतू त्यांच्या सडलेल्या जातीयवादी विचारसरणीचा आणि अनुसूचित जातींबद्दलच्या वृत्तीचा वारसा पुढे नेत आहे, असे ते म्हणाले.