शिरपूर तालुक्यातील पनाखेड शिवारातील एका हॉटेलमधून पोलिसांनी ११ वाहनांसह मद्यसाठा जप्त केला. या सर्व ऐवजाची किंमत कोटीच्या घरात आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील पनाखेड शिवारातील हॉटेल भिवानी येथे रसायने आणि देशी-विदेशी मद्याचा बेकायदेशीर व्यापार-व्यवहार होणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांना मिळाली. त्यानुसार मध्यरात्री हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला असता दोन टँकर, आठ ट्रक आणि एक पिकअप वाहन संशयास्पद स्थितीत उभे असलेले दिसले. या वाहनातील रसायने आणि अन्य साहित्याची तपासणी केली असता एका वाहनात बीअरच्या बाटल्यांची एक हजार खोकी, व्हिस्कीची ५७५ खोकी आढळली. दोन्ही टँकरमध्ये कित्येक लिटर रसायन आढळले. विशाखापट्टणम येथून या रसायनांची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सायंकाळपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.
संग्रहित लेख, दिनांक 25th Feb 2013 रोजी प्रकाशित
बनावट मद्यसाठय़ासह वाहने जप्त
शिरपूर तालुक्यातील पनाखेड शिवारातील एका हॉटेलमधून पोलिसांनी ११ वाहनांसह मद्यसाठा जप्त केला. या सर्व ऐवजाची किंमत कोटीच्या घरात आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील पनाखेड शिवारातील हॉटेल भिवानी येथे रसायने आणि देशी-विदेशी मद्याचा बेकायदेशीर व्यापार-व्यवहार होणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांना मिळाली.
First published on: 25-02-2013 at 03:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vehicles with fake liquor stok seize