जळकोट तालुक्यातील केकतसिंदगी येथील साहित्यिक विलास सिंदगीकर यांच्या ‘रक्त आणि भाकर’ या कथासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बार्शी (सोलापूर) शाखेचा शाहीर अमर शेख राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 ३० नोव्हेंबर रोजी बार्शी येथे मल्लिका अमर शेख व मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. विलास सिंदगीकर यांचे यापूर्वी भूकबळी, गारपीट, उतरंड आदी कथासंग्रह तर ढगा ढगा धाव रे, पाऊसझडी आणि गीत निळय़ा आकाशाचे हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. सिंदगीकर यांना अखिल भारतीय साहित्य अकादमी, नवी दिल्ली, भारत सरकारची प्रवासवृत्ती मिळाली आहे. इयत्ता चौथीच्या मराठीच्या पुस्तकात ‘आभाळमाया’ या त्यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या कथा आणि कथासंग्रहाचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vilas sindgikars story anthology state reward
First published on: 22-11-2014 at 01:51 IST