सांगली : जिल्ह्यातील ८३ ग्रामपंचायतींसाठी रविवारी सकाळपासून मोठ्या चुरशीने मतदान सुरू झाले. पहिल्या दोन तासांत सुमारे १४ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील ८३ ग्रामपंचायतींसाठी ३६५ केंद्रावर रविवारी मतदान झाले. स्थानिक पातळीवरील निवडणूक असल्याने मोठी चुरस दिसून येत आहे. मळा भागातून व रानवस्तीवरून मतदारांना आणण्यासाठी वाहनांचा सर्रास वापर दोन्ही गटांकडून केला जात आहे.

निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. निवडणुकीमध्ये १ हजार ७२८ जणांचे भवितव्य मतदार निश्‍चित करणार आहेत. जिल्ह्यात जाहीर झालेल्या ९४ पैकी ११ ग्रामपंचायती आणि १३ गावी थेट सरपंच अविरोध निवडण्यात आले असून उर्वरित ८३ गावांच्या थेट सरपंच पदांसाठी २६८ तर सदस्य पदाच्या ६६४ जागांसाठी १ हजार ५०५ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायतींमध्ये एकूण १ लाख ८७ हजार ७९८ मतदार असून यामध्ये पुरुष मतदार ९६ हजार ८६७, स्त्री मतदार ९० हजार ९३० व इतर १ मतदारांचा समावेश आहे.

Jalgaon, Private Bus Overturns in jalgaon, Five Injured, five injured in Bus Overturns, Guardian Minister Gulabrao, Relief Efforts, Minister Gulabrao Patil Leads Relief Efforts,
जळगाव जिल्ह्यात खासगी बस उलटून पाच प्रवासी गंभीर; मंत्री गुलाबराव पाटील यांचे मदतकार्य
Illegal Liquor and Drugs, Worth Over 5 Crore, Seized in Nashik, Illegal Liquor and Drugs Seized in Nashik, Start of Lok Sabha Poll Code of Conduct, nashik, nashik news, Illegal Liquor news,
आचारसंहितेत नाशिक जिल्ह्यात साडेपाच कोटीचा मद्यसाठा, अमली पदार्थ जप्त
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू
thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना

हेही वाचा – “…त्यामुळे चेहऱ्यावरचं हसू जातंय”, मनोज जरांगेंनी दिली प्रकृतीविषयी माहिती

हेही वाचा – मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांचा विषय पेटणार

मिरज तालुक्यातील संवेदनशील असलेल्या नांद्रे या गावी मतदाराला पैसे वाटप केले असल्याची तक्रार अभिजित सकळे यांनी संदीप पाटील याच्याविरुद्ध केली असून पाटील यांनीही चपाते प्लॉटवर मतदारांना का भेटतोस असे म्हणून शिवीगाळ करीत मारहाण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.