सोलापूर : यंदाच्या पावसाळ्यात तीन महिने पावसाने हुलकावणीच दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरले असताना जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणातही पाणीसाठा जेमतेम असल्यामुळे सार्वत्रिक चिंता व्यक्त होत असतानाच सुदैवाने धरणाच्या वरील भागात होणा-या जोमदार पावसामुळे धरण वेगाने भरत आहे. त्यामुळे सोलापूरकर सुखावले आहेत.

मागील १५ दिवसांत उजनी धरणातील पाणीसाठा वधारत असून अवघ्या २० टक्क्यांच्या पुढे न वाढणारा धरणातील पाणीसाठा आता वेगाने वाढत ४० टक्क्यांच्या दिशेने वाटचाल करीत आहे. रविवारी सायंकाळी धरणात एकूण पाणीसाठा ८४.२३ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा २०.५१ पर्यंत वाढला होता. गेल्या तीन दिवसांत पाणीसाठा झपाट्याने वाढला असून येत्या दोन दिवसांत उपयुक्त पाणीसाठा ५० टक्के सर करण्याची आशा निर्माण झाली आहे.

two Children Drown While Swimming, Surya River, palghar taluka, One Rescued, two dead Body Found , two Children Drown in Surya River, palghar news, Drown news,
सूर्या नदीत दोघांचा बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना

हेही वाचा >>> सातारा : किसन वीर कारखान्याला मदत होत नाही, तोपर्यंत शपथ नाही – मकरंद पाटील

उजनी धरणाची एकूण क्षमता १२३ टीएमसी एवढी आहे. धरण शंभर टक्के भरण्यासाठी आणखी ४० टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे. प्राप्त परिस्थितीत धरणातील वाढलेला पाणीसाठा पाहता धरणातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रविवारी दुपारी उजनी धरणात दौंडमार्गे येणारा पाण्याचा विसर्ग २५ हजार ८५९ क्युसेक इतका होता. त्यात सायंकाळी नऊ हजार क्युसेकने वाढ होऊन ३४ हजार १५८ क्युसेक विसर्गाने पाणी धरणात मिसळत होते. पुण्यातील बंडगार्डन येथून नदीत येणा-या पाण्याचा विसर्ग वाढून १६ हजार १२३ क्युसेकपर्यंत गेल्यामुळे उद्या सोमवारी धरणात मिसळणारे पाणी सुमारे ४० हजार क्युसेकपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा >>> सातारा : वाघनखं खोटी आहेत हे सिद्ध करून दाखवा – शिवेंद्रसिंहराजे

या धरणावर जिल्ह्यातील सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी अवलंबून आहे. परंतु यंदा पावसाळा सरत आला तरी धरणात पाणीसाठ्याची स्थिती दयनीय असल्यामुळे शेती संकटात आली होती. यातच सोलापूर शहरासह पंढरपूर व सांगोला शरासाठी धरणातून सुमारे पाच टीएमसी पाणी भीमा नदीवाटे सोडण्यात आल्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी खालावला होता. धरण किमान ३३ टक्के भरले तरच पाण्याचे आवर्तन सोडता येते. सुदैवाने धरणात पाणीसाठा वाढू लागल्यामुळे शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. दुसरीकडे उजनी धरणातील अल्पसा शिल्लक असलेला पाणीसाठा विचारात घेता सोलापूरसाठी पिण्याकरिता शेजारच्या कर्नाटकातील आलमट्टी धरणातून पाणी मिळविण्याचे सुरू असलेले प्रयत्नही आता करावे लागणार नाहीत.