राज्याचे नगरविकास मंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी दिलेली नाही. नक्षलवाद्यांकडून मिळालेलं धमकीचं पत्र ही शिंदे यांचीच स्टंटबाजी असल्याचा दावा नक्षलवाद्यांनी केला आहे. “या स्टंटबाजीचा आम्ही निषेध करतोय,” असे नक्षलवादी संघटनेचे प्रवक्ते श्रीनिवास यांनी म्हटलंय. याशिवाय श्रीनिवास यांनी आपल्या पत्रातून लोह खाणींची लीज आणि इतर काही मुद्द्यांवरून एकनाथ शिंदे आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधलाय. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिलंय.

दोन आठवड्यांपूर्वी गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती समोर आली होती. नक्षल्यांकडून धमकीचे पत्र देण्यात आले होते. या धमकीच्या पत्रामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्यानंतर ७ दिवसांनी त्यांनी जवळच्या पोलीस स्थानकामध्ये जाऊन याबाबत तक्रार दिली होती. एकनाथ शिंदेच्या कुटुंबासोबतच अधिकाऱ्यांच्या जिवालाही धोका असल्याचे सांगितले जात होते, याचदरम्यान एकनाथ शिंदेना कोणतंही धमकीचं पत्र दिलं नसल्याचं नक्षली संघटनेनं स्पष्ट केलंय, त्यामुळे या प्रकरणासंदर्भात गोंधळाचं वातावरण आहे.

sanjay raut devendra fadnavis (9)
“मोदींची जागा घेण्याचे फडणवीसांचे स्वप्न, म्हणूनच त्यांचा…”, संजय राऊतांची खोचक टीका
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही
bhavana gawali
“भावना गवळी यांना उमेदवारी न दिल्यास सामूहिक राजीनामे देणार,” शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा
Vijay Shivtare
मुख्यमंत्र्याचं ऐकलं नाही, पण ओएसडींच्या फोननंतर शिवतारे नरमले; माघार घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…

“आमच्या दलमच्या अनेक साथीदारांना तुम्ही आल्यापासून शहीद व्हावं लागलं. त्याचा बदला आम्ही लवकरच घेऊ,” असे धमकीवजा पत्र सीपीआय (माओवादी) या नावाने ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहचल्याची माहिती देण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांना गडचिरोलीत काम सुरू केल्यापासून आमचा पैसा बंद झाला असेही या पत्रात नमूद होते व याचे चोख उत्तर दिले जाईल असे म्हणत शिंदें व त्यांच्या परिवाराला याची पूर्ण किंमत चुकवावी लागेल,” अशी धमकी पत्रात देण्यात आली होती.