अयोध्येत २२ जानेवारी २०२४ या दिवशी राम मंदिरात राम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या तिघांच्या उपस्थितीत तसंच साधू-संतांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. नुकतीच अयोध्येतल्या मंदिरात रामनवमी साजरी झाली आणि सूर्यतिलक सोहळाही पार पडला. आता रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही असा प्रश्न शरद पवारांनी विचारला आहे.

काय म्हणाले शरद पवार?

“एका मिटिंगमध्ये माझ्यापुढे विषय निघाला त्यात महिलांनी अशी तक्रार केली की रामाचं सगळं बोलत आहात मग सीतेची मूर्ती का बसवत नाही? मी महाराष्ट्रात फिरतो आहे. मला अनुकूल चित्र दिसतं आहे. राम मंदिर होऊन गेलं आता त्याविषयी लोकांमध्ये चर्चा नाही. तसंच या सरकारविषयी नाराजी आहे.” असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांना राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल का? हा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- “जे शरद पवार निवडणुकीसाठी घरातल्या सुनेला…”, सीतेच्या मूर्तीबाबत केलेल्या वक्तव्यावरून भजपाचा टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी काय म्हणाले शरद पवार?

“कांद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा देशात साखरेचं उत्पादनही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झालं. निर्यातीचा प्रश्न आहे. शेतीमालल बाहेर गेला पाहिजे, शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे अधिकचे पडले पाहिजेत या गोष्टीला या सरकारचा विरोध आहे. शेतकऱ्यांना वर्षातून एकदा सहा हजार रुपये द्यायचे, पण खतांचे दर वाढतात, औषधं महाग झाली आहेत, मजुरी महाग झाली आहे याकडे कोण बघणार?” असाही प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला.