भाजपा हा बाजारबुणग्यांचा पक्ष झाला आहे. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी, भाऊसाहेब फुंडकर यांनी मेहनत करून भाजपा वाढवला. पण, आता बाजरबुणगे येत आहेत. भ्रष्टाचाऱ्यांनी माखलेल्यांना भाजपात घेतलं जात आहे. त्यांच्या सतरंज्या घालण्याचं काम भाजपाचे निष्ठावंत अंधभक्त करत आहेत, असा हल्लाबोल शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते यवतमाळमधील दिग्रस येथे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

“आज मी एकटा आहे, असं भाजपाला वाटतं. पण, कार्यकर्त्यांच्या मनातून बाळासाहेब ठाकरे काढू शकणार नाही. राजकारणात फोडाफोडी होत असते. छगन भुजबळ आपल्यात होते, नंतर राष्ट्रवादीत गेले. आता तिकडे गेले आहेत. पण, पक्ष संपवून टाकण्याची वृत्ती आली आहे. ती वृत्ती संपवण्याची गरज आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Sharad Pawar criticism that Narendra Modi has no moral right to demand the power of the country again
नरेंद्र मोदींना देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार नाही; शरद पवारांचा हल्लाबोल
chavadi political situation in maharashtra ahead of lok sabha election diwali organized by political leaders
‘सत्ता खूप वाईट, नंतर कुणी चहा सुद्धा पाजत नाही’, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत
Baban Gholap
शिंदे गटात प्रवेश करून बबन घोलप यांनी काय साधले ?
Baban Gholap, Shinde group,
माजी मंत्री बबन घोलप यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय

हेही वाचा : राष्ट्रवादीच्या पक्षफुटीवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जसे दिसते, तसे…”

“विरोधकांनी जाहीर सभेत आमच्यावर बोलवं, आम्ही तुमच्यावर बोलतो. जनता ठरवेल ते मान्य करायचं, याला म्हणतात लोकशाही. मात्र, आता तुम्ही मत कोणालाही द्या सरकार माझेच येणार, असं चाललं आहे. पूर्वी मतपेटीतून सरकार जन्माला यायचं. आता खोक्यातून सरकार जन्माला येत आहे,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

हेही वाचा : शरद पवार यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली; म्हणाले, “भविष्यात हा सैतान…”

“आपल्याकडील ४० जण आमदार भाजपाकडे गेले आहेत. अपक्षांचाही त्यात समावेश आहे. १६० की १६५ जणांचं मजबूत सरकार आहे. तर, पुन्हा राष्ट्रवादी चोरण्याची काय गरज होती? अमित शाहांबरोबर अडीच-अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद असं ठरलं होतं. शिवसेनेचा मुख्यमंत्री तेव्हाही करायचा होता. आता, पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच,” असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.