देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना डॅमेज करायचं हे छगन भुजबळांना वाटतं आहे. त्यामुळे त्यांच्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. आम्ही काही त्याच्याकडे लक्ष देत नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. भुजबळांना वाटतंय सगळे ओबीसी बांधव उपाशी मेले पाहिजेत. त्यामुळे आम्ही अशा माणसाकडे लक्षच दिसत नाही असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?

“तू राजीनामा दे, समुद्रात उडी मार, काहीही कर आम्हाला काय घेणं देणं आहे. डोक्यावर घेऊन फिर राजीनामा. तू मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलला तर तुला सोडत नसतो मी. राजीनामा दिला म्हणजे काय उपकार केले का आमच्यावर? आम्हाला काय करायचं त्याच्याशी? तू मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको. येवल्याचं ते लय विचित्र आहे. सगळ्या पक्ष मोडायचं हेच त्याला माहीत आहे. ज्या पक्षाने त्याला मोठं केलं तो पक्षही त्याने मोडला. सरकारही मोडायचं असं दिसतंय. माझी सरकारला विनंती आहे जेवढी त्याची (छगन भुजबळ) गरज आहे तेवढी मराठ्यांचीही असू द्या.” असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
Manoj Jarange patil on Pankaja Munde Maratha Reservation
“माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा…”, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडेंना इशारा
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी

छगन भुजबळ काय म्हणाले?

ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ म्हणाले, “सरकारमधले काही लोक, विरोधी पक्षातले काही नेते माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. विरोधक मला म्हणतायत की, सरकारचे निर्णय पटत नाहीत तर मग राजीनामा द्या. सरकारमध्ये का राहता? सरकारवर टीका करता आणि त्याच सरकारमध्ये कसे काय राहता? हिंमत असेल तर राजीनामा द्या. काल कोणीतरी बोललं या भुजबळला लाथ घालून मंत्रिमंडळाबाहेर काढा, भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला बाहेर हाकला. मला या सर्वांना, माझ्या विरोधकांना, स्वपक्षातील आणि स्वसरकारमधील लोकांना सांगायचं आहे की मी आधीच राजीनामा दिला आहे.”