‘ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा’ या संत चोखामेळा यांच्या अभंगातील दोन ओळी. काही गोष्टी वरून चांगल्या दिसत नाहीत, पण त्यांचं अंतरंग सुंदर, देखणं, गोड असतं. चोखामेळांच्या वरील ओळींना दुजोरा देणारी ही गोष्ट.
सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत यंदा भरघोस यश मिळालं होतं. सुमित्राबाईंनी अभ्यास करून घेतला होता म्हणून अर्थातच त्या खूश होत्या. मुलांना त्यांनी आपल्या घरी भेळ खायला बोलावलं. चटपटीत भेळ मुलांना आवडली. नंतर बाईंनी छानसं आंबट गोड सरबत दिलं. मुलं खूप आनंदात होती. गप्पागोष्टींत रंगली होती. बाई म्हणाल्या, ‘‘मुलांनो, तुम्हाला सगळं आवडलेलं दिसतंय, पण बाळांनो, भेळीसाठी माझ्याकडे एकसारख्या डिशेस नव्हत्या. सरबत द्यायला पेलेसुद्धा सगळे वेगवेगळे. मला वाईट वाटतंय.’’ एक चुणचुणीत मुलगी म्हणाली, ‘‘बाई, भेळ इतकी मस्त होती की आमचं कोणाचंही लक्ष डिशकडे गेलंच नाही. भेळीसारखंच सरबत पण छान चविष्ट असणार हाच विचार सर्वानी केला असेल, म्हणून भराभर पेले आम्ही उचलले. ते बाहेरून कसे आहेत इकडे पाहिलंय कोणी? आणि बाई, तुम्ही शिकवलेला श्लोक पण खूप आवडला.’’ मिनिटभर विचार केल्यावर बाईंच्या लक्षात आलं, हिने मनातील गोष्ट सोप्या शब्दात सांगितली. अंतरंग मोहून टाकणारं असेल तर बाह्य़रंगाकडे दुर्लक्ष होतं. अंतरंग लोकांना मोहवून टाकणारं असावं.

हल्ली फेसबुकवर जुने मित्र-मैत्रिणी भेटतात. व्हॉट्सअ‍ॅप, ईमेलवरून संपर्कात राहता येतं. त्यातूनच ‘रियुनियन’ची कल्पना जन्माला आली. असंच एक रियुनियन १९९२ मध्ये पदवी घेतलेल्या मुला-मुलींनी आयोजित केलं. त्या वेळचे प्राचार्य आणि एक प्राध्यापक पण यायला तयार झाले. ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी सगळे जमले. जुन्या आठवणी, एकमेकांची ख्यालीखुशाली यात बराच वेळ गेला. आता प्रत्येकाने आपली सद्य:स्थिती थोडक्यात सांगायची होती. आपण सुखासीन आयुष्य जगतोय हे सगळ्यांनी सांगितलं. बायकांनी, आपणसुद्धा फक्त चूलमूल करत नाही, शिक्षणाचा उपयोग पैसे कमाविण्याकरता करतो हे ठासून सांगितलं.

husband wife killed 6 injured in road accident
नागपूर : भीषण अपघातात पती-पत्नी ठार, ६ जखमी; कारची उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक
hitler swastika banned in switzerland
स्वस्तिकचा हिटलरशी संबंध कसा आला? स्वित्झर्लंडला या चिन्हावर बंदी का आणायची आहे?
A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल

प्राचार्य, प्राध्यापक दोघांनी विचारलं, ‘‘तुमच्या वागण्या-बोलण्यातून तुम्ही सर्वजण आयुष्यात खूप यशस्वी झालेले आहात, फार सुखी आहात हे कळालं, आनंद झाला. आमंत्रितांपैकी कोणी यायचं राहिलंय का?’’ यांच्या या प्रश्नावर ‘‘सगळे आलेत, कोणी राहिलं नाही.’’ हे उत्तर मिळालं. ते ऐकल्यावर सर म्हणाले, ‘‘सुरेंद्र, अजित आले नाहीत. का आले नाहीत ही चौकशी कोणीही केली नाही. कारण त्यांच्याकडे पदवी नाही, कार नाही, चांगली मिळकत नाही. सुरेंद्र प्लंबर तर अजित इलेक्ट्रिशियन आहे म्हणून? पण दोघेजण वृद्धाश्रम, मुलांचे आश्रम यांच्या मेंटेनन्सचं काम अगदी कमी खर्चात करतात. कुटुंबाचा खर्च फावल्या वेळात खासगी कामं करून भागवतात. आज त्यांनी कॉलेजमधील या कोर्सला जाणाऱ्या गरजू मुलांसाठी २५ हजारांचा चेक आणि इलेक्ट्रिकल कामं कमी खर्चात करण्याचा करार पाठवला आहे. हे सर्व कथन करण्यामागचे कारण सांगायची गरज आहे का?’’ या प्रश्नाचं उत्तर अर्थात ‘शांतता’ पसरली. भुलू नये कोणी वरलिया रंगा!

– गीता ग्रामोपाध्ये
geetagramopadhye@yahoo.com