मूळ नाव – प्रबोधचंद्र डे
जन्मदिनांक – १ मे १९१९, कोलकाता येथे
कौटुंबिक पार्श्वभूमी – काका कृष्णचंद्र डे हे प्रसिद्ध संगीतकार असल्याने घरात संगीताचे वातावरण, होते. साहजिकच मन्नादांवर लहानपणापासून गाण्याचे संस्कार झाले. के. सी. डे व उस्ताद डबीर खाँ यांच्याकडून त्यांनी गाण्याची मुळाक्षरे गिरवली. पुढे स्कॅाटिश चर्च कॅालेजमध्ये शिकताना सलग तीन वर्ष संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. संगीतात कारकीर्द करण्यासाठी १९४२ मध्ये के. सी. डे यांच्यासोबत मुंबईत दाखल झाले.  
कारकिर्द – मुंबईत के. सी. डे खेमचंद प्रकाश, अनिल विश्वास व सचिनदेव बर्मन यांच्याकडे संगीत सहाय्यक या नात्याने त्यांनी उमेदवारी केली. याच काळात हिंदी चित्रपटसंगीताला त्यांना जवळून अभ्यासता आले. एकीकडे सहाय्यक संगीतकाराची जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी आपली मूळ आवड म्हणजे शास्त्रीय संगीताचे शिक्षणही सुरूच ठेवले होते. मुंबईत उस्ताद अमन अली खाँ आणि उस्ताद अब्दुल रहेमान खाँ यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे पुढील शिक्षण घेतले.
१९४३ मध्ये रामराज्य या चित्रपटासाठी शंकरराव व्यास यांच्या संगीत दिर्ग्दशनात हिंदी चित्रपटासाठी पहिले पार्श्वगायन करण्याची संधी त्यांना मिळाली. मात्र उपर गगन विशाल (मशाल) या सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यामुळे त्यांना लोकप्रियता लाभली. संगीतकार शंकर-जयकिशन यांनी त्यांच्या गायकीचा चांगला वापर करुन घेतला. हिंदीसह मराठी, गुजराथी, बंगाली, मल्याळम, कन्नड, आसामी आदी अनेक भाषांतून सुमारे साडेतीन हजार गाण्यांचे पार्श्वगायन त्यांनी केले.

मन्ना डे यांना मिळालेले पुरस्कार;
* १९७१ पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.
* २००४ जीवनगौरव महाराष्ट्र शासनाकडून गौरव.
* २००५ पद्मभूषण पुरस्कार.
* २००७ दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
* ‘झनक झनक तोरी बाजें पायलिया’ (मेरे हुजूर) या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार.
* ‘ए भाय जरा देखके चलो’ (मेरा नाम जोकर) या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार तसेच फिल्मफेअर पुरस्कार

Commenting on the problems of senior citizens Old furniture marathi movie Director Mahesh Manjrekar
रंजक नाटय़ाची फोडणी
kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!

मन्ना डे यांची निवडक लोकप्रिय हिंदी चित्रपटगीते (एकल व युगुलगीते);
ए मेरे प्यारे वतन (चित्रपट- काबूलीवाला)
प्यार हुआ इकरार हुआ है (चित्रपट- श्री ४२०)
धरती कहे पूकार कें (चित्रपट- दो बिघा जमीन)
सूर ना सजे (चित्रपट- बसंत बहार)
तू प्यार का सागर है (चित्रपट- सीमा)
लागा चुनरीमें दाग (चित्रपट- दिल ही तो है)
ए मेरी जोहरजबीं (चित्रपट- वक्त)
आजा सनम मधूर चाँदनी में हम (चित्रपट- चोरी चोरी)
ये रात भिगी भिगी (चित्रपट- चोरी चोरी)
उमड घुमडकर आयी रे घटा (चित्रपट- दो आँखे बारह हाथ)
पूछो ना कैसे मैने रैन बिताई (चित्रपट- मेरी सूरत तेरी आँखे)
कौन आया मेरे मनके द्वारे (चित्रपट- देख कबिरा रोया)
याल्ला याल्ला दिल ले गई (चित्रपट- उजाला)
मस्तीभरा है समा (चित्रपट- परवरिश)
ना तो कारवाँ की तलाश है (चित्रपट- बरसात की रात)
तू छुपी है कहाँ (चित्रपट- नवरंग)
झनक झनक तोरी बाजे पायलियाँ (चित्रपट- मेरे हुजूर)
तुम गगन के चंद्रमा (चित्रपट- सती सावित्री)
मेरे दिलमें है एक बात (चित्रपट- पोस्ट बाक्स नं 999)
दिलकी गिरह खोल दों (चित्रपट- रात और दिन)
हर तरफ अब यही अफसानें है (चित्रपट- हिंदूस्थान की कसम)
आओ ट्वीस्ट करे (चित्रपट- भूत बंगला)
कस्मे वादे प्यार वफा सब (चित्रपट- उपकार)
यारी है इमान मेरा (चित्रपट- जंजीर)

मन्ना डे यांनी गायलेली लोकप्रिय मराठी चित्रपटगीते (एकल व युगुलगीते);
अ आ आई, म म मका (चित्रपट- एक धागा सुखाचा)
घन घन माला नभी दाटल्या (चित्रपट- वरदक्षिणा)
नंबर 54… बांबूच्या वनात राहायला हवे (चित्रपट- घरकूल)
धूंद आज डोळे, हवा धूंद झाली (चित्रपट- दाम करी काम)
होम स्वीट होम (चित्रपट- जावई विकत घेणे आहे)
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला (चित्रपट- देवकीनंदन गोपाला)
जय जय हो महाराष्ट्राचा (धन्य ते संताजी धनाजी)
राम कहो रहीम कहो (चित्रपट- शिर्डीचे श्री साईबाबा)
काळ चालला पुढे (चित्रपट- दोन घडींचा डाव)
देव दयेचा अथांग सागर (चित्रपट- क्षण आला भाग्याचा)
माझ्या मनाची केलीस चोरी (चित्रपट- या मालक)
विसरुन कसा (चित्रपट- या मालक)
हा दुखभोग सारा (चित्रपट- चिमुकला पाहुणा)
तू माझ्या स्वप्नांची कल्पना (चित्रपट- सावली प्रेमाची)

गैरफिल्मी मराठी गीते
आधी रचिली पंढरी
चला पंढरीसी जाऊ
आवडे हे रुप
मिथ्या हा संसार अवघा
हाती वीणा मुखी हरि
शांतीदीप हा आज निमाला
युद्ध हवे की बुद्ध हवा