अभिनेता विद्युत जामवाल बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. त्याच्या अनोख्या फाईटिंग स्कीलची प्रचंड स्तुती केली जाते. या अ‍ॅक्शनस्टारची नोंद आता ‘द रिचेस्ट’ने घेतली आहे. या नामांकित वेब पोर्टलने संशोधन करुन जगातील १० सर्वाधिक खतरनाक जिवंत योद्ध्यांची एक यादी जाहिर केली आहे. या यादीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, जगप्रसिद्ध अ‍ॅडवेंचरर बेयर ग्रिल्स यांसारख्या मंडळींची नावं आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे या खतरनाक योद्ध्यांमध्ये विद्युत जामवालचा देखील सामावेश करण्यात आला आहे.

विद्युत जामवाल एक उत्तम मार्शल आर्टिस्ट आहे. ३ वर्षांचा असल्यापासून तो कलरीपायट्टु या फायटिंग स्टाईलचा सराव करत आहे. या शिवाय कराटे, कुंगफू, जुडो, विनचिंग, फ्रि स्टाईल बॉक्सिंग, किक बॉक्सिंग यांसारख्या अनेक मार्शल आर्ट स्टाईल्सचा त्याने अभ्यास केला आहे. चित्रपटांमधील सर्व स्टंट तो स्वत:च करतो. खऱ्याखुऱ्या आयुष्यात जर कोणी त्याच्याशी पंगा घेतला तर काही मिनिटांत तो त्याला धुळ चारेल. असा विश्वास ‘द रिचेस्ट’ कंपनीला आहे. त्यामुळे त्यांनी विद्युतची नोंद जगातील सर्वोत्कृष्ट जिवंत फायटर्समध्ये केली आहे.

‘द रिचेस्ट’ने आपल्या या यादीला ’10 पीपल यू डॉन्ट वांट मेस विथ’ असं नाव दिलं आहे. या यादीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आहेत. कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट थर्ड डन ही डिग्री त्यांनी घेतली आहे. म्हणजेच सर्व सामान्य भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी दोन वेळा मास्टर्स डिग्री घेतली आहे. याशिवाय शिफू शी यन मिंग (शाओलिन एक्सपर्ट), विटो पिरबजारी (फिटनेस एक्सपर्ट), गीगा उगुरु (रियल लाइफ निंजा), हट्सुमी मसाकी (निंजा कुंगफू एक्सपर्ट), जेडी अँडरसन (आईस मॅन), मुस्तफा इस्माईल (बॉडी बिल्डर), मार्टिन लिचिस (वेट लिफ्टर), बेयर ग्रिल्स (वाइल्ड अॅडवेंचरर) या खतरनाक योद्ध्यांचा सामावेश आहे.