बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाला आहे. स्वत: सोनालीने ही धक्कादायक माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली असून सध्या तिच्यावर न्युयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. ‘सरफरोश’, ‘हम साथ साथ है’ आणि ‘लज्जा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका केलेल्या सोनालीने अशी पोस्ट केल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र या साऱ्यावर ती मात करेल असा आत्मविश्वास तिच्या या पोस्टमधून दिसून येत आहे. सध्या पाहायला गेलं तर बॉलिवूड आणि क्रिकेट या क्षेत्रांमधील असे काही सेलिब्रेटीज आहेत जे या परिस्थितीतून गेले आहेत आणि त्यांनी यशस्वीरित्या कॅन्सरवर मात केली आहे.

१. युवराज सिंग – क्रिकेटविश्वातला ‘सिक्सरकिंग’ या नावाने ओळखला जाणारा युवराज सिंग याने देखील कधी काळी कॅन्सरशी दोन हात केले आहेत. सध्या त्याचाकडे पाहून तो या मोठ्या आजारातून बाहेर पडला आहे असं वाटणार नाही. मात्र युवराजने हे शक्य करुन दाखवत त्याच्या चाहत्यांपुढे एक मिसाल कायम केली आहे. युवराजला कॅन्सर झाल्याचं समजताच त्याला प्रचंड धक्का बसला होता. या साऱ्या प्रकारामुळे तो नैराश्याच्या गर्ततेत हरविला होता. मात्र त्यापासून दूर पळण्यात अर्थ नाही. या आजारापासून तुम्ही जेवढं लांब पळाल तो तुमच्या मागेच धावेल असं समजून युवराजने मोठ्या धीराने कॅन्सरशी सामना केला. योग्य उपचार पद्धती आणि मनोबल याच्या बळावर तो या आजारातून आज बरा झालेला आहे.

Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
a young man broke traffic rules while making reels
VIDEO : रील बनवण्याच्या नादात पठ्ठ्याने तोडले वाहतूक नियम, दिल्ली पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड

२.मनिषा कोईराला – अभिनेत्री मनिषा कोईराला हिला ओव्हरीजचा कॅन्सर झाला होता. त्यामुळे तिला शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. मात्र शस्त्रक्रियेपूर्वी मनिषाने तिच्या फेसबुक मित्रांसाठी एक भावनिक संदेश लिहीला होता. नेपाळमध्ये जन्मलेल्या मनिषाला वयाच्या ४२ व्या वर्षी कॅन्सरने गाठले होते. मात्र या धक्क्यामुळे खचून न जाता मनिषाने ६ महिने न्युयॉर्कमध्ये उपचार घेतलं आणि त्यातून ती यशस्वीरित्या बाहेर पडली. विशेष म्हणजे या आजारातून बाहेर पडल्यानंतर मनिषा पुन्हा तिच्या करिअरकडे वळली असून नुकताच तिचा ‘संजू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

३.मुमताज – बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या जोरावर स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी मुमताज हे एक मुख्य नाव आहे. चित्रपटसृष्टीमध्ये नायिका आणि खलनायिका या दोन्ही प्रकारच्या भूमिका वठविणाऱ्या मुमताज २००० साली ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. मात्र या गंभीर आजाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन तिने बदलला आणि हसत हसत त्याला सामोरी गेली. याचाच परिणाम ती या आजारातून सुखरुप बाहेर पडली.

४. अनुराग बासू- हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती करणारे अनुराग बासू यांनादेखील कॅन्सरने गाठले होते. २००४ मध्ये तुमसा नही देखा या चित्रपटाची निर्मिती करत असताना त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. अनुराग यांना ल्युकेमिया हा कॅन्सर झाला होता. विशेष म्हणजे त्यांच्याजवळ केवळ ३ ते ४ महिने असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं. मात्र तरीदेखील खंबीर मनोबलाच्या आधारावर अनुराग यांनी या आजारावर मात केली. यावेळी त्यांच्यावर किमोथेरपीही करण्यात आली होती.

५. लिसा रे – प्रसिद्ध मॉडेल लिसा रे हिला मल्टिपल मायलोमा हा रक्ताचा कॅन्सर झाला होता. मात्र या कॅन्सरशी तिने खूप हिमतीने लढा दिल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे तिच्या या लढ्याचा अनुभव तिने ‘द यलो डायरीज’ या ब्लॉगवर वेळोवेळी ‘शेअर’ केले आहेत. या आजारावर तिने किमोथेरपीदेखील घेतली होती. विशेष म्हणजे या आजारातून बाहेर पडत तिने कॅन्सरवर मात केली आहे.