बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक इरा खान ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. ती सतत बॉयफ्रेंड नुपुर शिखरे सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकताच इराने शेअर केलेला फोटो चर्चेत आहे.
इराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नुपुर तिच्यासोबत असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘लॉकडाउनसाठी तयार आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. इरा आणि नुपुरचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान राहतो ‘या’ आलिशान घरात, पाहा फोटो
काही दिवसांपूर्वी नुपुर इराची बहिण झेनच्या लग्नाला गेला होता. इराने लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तिने शेअर केलेले फोटो तेव्हा व्हायरल झाले होते.
लॉकडाउनदरम्यान इरा आणि नुपूर यांच्यातल्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झाले. आता हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचे समजतंय. महाबळेश्वर इथल्या आमिर खानच्या फार्महाऊसमध्ये दोघांनी सुट्ट्यांचा आनंद घेतला. इराने नुपूरची ओळख आई रिना दत्ता यांच्याशी करून दिली. इतकच नव्हे तर तिघांनी जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत मिळून दिवाळी एकत्र साजरी केली होती. नुपूर हा फिटनेस कोच आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 8, 2021 4:25 pm