01 October 2020

News Flash

अपघातग्रस्तांना मदत करण्याची आमिरची प्रतिज्ञा

'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाद्वारे समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांना जनतेसमोर आणणा-या मि.परफेक्टशनिस्ट आमिर खानने एक नवी प्रतिज्ञा केली आहे.

| October 13, 2014 12:53 pm

‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाद्वारे समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांना जनतेसमोर आणणा-या मि.परफेक्टशनिस्ट आमिर खानने एक नवी प्रतिज्ञा केली आहे. सत्यमेव जयतेच्या तिस-या पर्वात सध्या रस्त्यावरील अपघात की हत्या? या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी आमिरने आपण अपघात झाल्यावर समोरच्या व्यक्तीकडे त्रयस्थपणे न बघता त्याला अजिबात पुढेमागे न पाहता लगेचच मदत करू अशी प्रतिज्ञा घेतली.
या कार्यक्रमाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, अंदाजे भारतात दर दिवशी ३८० लोकांचा मृत्यू केवळ अपघातामुळे होतो. खरं तर, यातील बहुतेकजणांचा मृत्यू हा अपघात नसून हत्या असल्याच्या मुद्दयावर कार्यक्रमात विशेषपणे मांडण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 12:53 pm

Web Title: aamir khan pledges to help the injured on roads
Next Stories
1 फर्स्ट लूकमध्ये पहा सोनाक्षी, अर्जुनचे ‘तेवर’
2 पाहाः शाहरुख, दीपिका, अभिषेकचे ‘नॉनसेन्स की नाइट’ गाणे
3 स्पृहा जोशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Just Now!
X