09 August 2020

News Flash

आमिर खानची मुलगी सिनेमा नाही, तर करणार नाटक

आमिर खानच्या मुलीचे रंगभूमीवर पदार्पण

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. परंतु यावेळी ती कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नव्हे तर तिच्या आगामी नाटकामुळे चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

Break a leg @khan.ira Proud of you. Love. a.

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

अरे हे काय झालं?; पबजी खेळून ‘ते’ झाले कोट्यधीश

इराने इतर स्टारकिड्स प्रमाणे चित्रपटांऐवजी थेट रंगभूमीवरुन अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ती अभिनेत्री म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून अभिनयक्षेत्राकडे वळली आहे. आमिरने नुकतेच तिच्या आगामी नाटकाचे पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. या नाटकाचे नाव ‘ब्रेक अ लेग’ असे आहे. “मला तुझा अभिमान वाटतो” अशा शब्दात अमिरने तिचे कौतुक केले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यवतीनं पटकावला ‘मिस युनिव्हर्स २०१९’ चा किताब

आमिर खान सध्या ‘लालसिंग चड्ढा’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. अलिकडेच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु असुन पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2019 3:58 pm

Web Title: aamir khans daughter ira makes her directorial debut mppg 94
Next Stories
1 कार्तिक पडला अर्जुनवर भारी, बॉक्स ऑफिसवर ‘पती पत्नी और वो’ची दमदार कमाई
2 Video: तो प्रश्न ऐकून महेश भट्ट यांचा पारा चढला आणि ते मोठ्याने ओरडू लागले
3 नेटफ्लिक्स भारतात गुंतवणार ३ हजार कोटी
Just Now!
X