News Flash

‘आशिकी’चे गाणे या पाकिस्तानी गाण्याची कॉपी? विवेक अग्नीहोत्रीने शेअर केला व्हिडीओ

पाहा त्या पाकिस्तानी गाण्याचा व्हिडीओ

१९९० साली महेश भट्ट यांचा ‘आशिका’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात अभिनेता राहुल रॉय आणि अभिनेत्री अनु अग्रवाल मुख्य भूमिकेत होते. तसेच या चित्रपटांमधील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. चित्रपटातील ‘तू मेरी जिंदगी है’ हे गाणे आजही लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळते. आता दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रीने ट्विट करत या गाण्याचा ओरिजनल ट्रॅक व्हिडीओ शेअर केला आहे.

विवेकने ट्विट करत व्हिडीओ शेअर केला आहे. तुम्हाला माहित आहे का महेश भट्ट यांच्या आशिकी चित्रपटातील सुपरहिट गाणे १९७७मधील पाकिस्तानी गाण्याची कॉपी आहे. हे गाणे तसवर खानुम यांनी गायले होते या आशयाचे ट्विट विवेक अग्नीहोत्रीने केले आहे.

विवेक अग्नीहोत्रीचे ट्विट पाहून अनेक यूजरने कमेंट केल्या आहेत. एका यूजरने ‘तुम्हाला असे वाटत नाही का चित्रपटातील गाणे ज्यांनी कंपेज केले आहे नदीम- श्रवण त्यांना प्रश्न विचारायला हवा’ असे म्हटले आहे.

‘आशिकी’ चित्रपटातील हे गाणे बॉलिवूडमधील लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. हे गाणे कुमार सानू आणि अनुराधा पौडवालने गायले आहे. तसेच नदीम-श्रवण यांनी कंपोज केले आहे. विवके अग्नीहोत्रीने हे गाणे पाकिस्तानी गाण्याची कॉपी असल्याचे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 12:36 pm

Web Title: aashiqui mahesh bhatt film tu meri zindagi hai original from pakistani song avb 95
Next Stories
1 VIDEO : ..अन् माणसांना पाहून सिंह पळू लागले; बिग बींनी सांगितला ‘तो’ अनुभव
2 Gunjan Saxena Trailer: कारगिल युद्धातील पराक्रमाची कथा
3 सुशांतच्या बहिणीने केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती
Just Now!
X