News Flash

‘अभय 2’ मधील ‘त्या’ फोटोप्रकरणी Zee 5 ने मागितली माफी, म्हणाले…

झी5 ने माफी मागितल्यानंतरही नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या अभय 2 या वेबसीरिजमध्ये शहिद जवान खुदीराम बोस यांचा फोटो गुन्हेगारांचे फोटो असलेल्या फलकावर लावण्यात आल्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे ट्विटरवर #BoycottZee5 हा हॅशटॅग ट्रेण्ड होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी सीरिजेच दिग्दर्शक आणि झी5 ने सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागितली आहे.

झी 5 ने ट्विट करत जाहीरपणे माफी मागितली आहे. मात्र तरीदेखील नागरिकांमधील संताप कमी न झाल्याचं पाहायला मिळत आहे. “घडलेल्या प्रकाराविषयी आम्ही माफी मागतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा,शोचे निर्माते आणि शो यांचा कोणताच हेतू नव्हता. अभय 2 मध्ये दाखविण्यात आलेला त्या दृश्यातील फोटो आम्ही धुसर( ब्लर) केला आहे”, असं ट्विट झी 5ने केलं आहे.

झी5 ने माफी मागितल्यानंतरही नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट असल्याचं दिसून येत आहे. अनेकांनी फोटो ब्लर करुन चालणार नाही, तर तो फोटो पूर्णपणे डिलीट करा अशी मागणी केली आहे.

आणखी वाचा- खुदीराम बोस यांचा फोटो गुन्हेगारांच्या बोर्डावर; नेटकऱ्यांकडून #BoycottZee5 ची मागणी

दरम्यान, या सीरिजमध्ये कुणाल खेमू मुख्य भूमिकेत असून राम कपूर हे गुन्हेगाराच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. या सीरिजमधील एका सीनमध्ये गुन्हेगारांचे फोटो असलेल्या फलकावर चक्क शहिद जवान खुदीराम बोस यांचं छायाचित्र लावण्यात आल्याचं पाहायला मिळालं. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची एकच लाट उसळली असून ट्विटरवर #BoycottZee5 या मागणीने जोर धरल्याचं दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 11:03 am

Web Title: abhay 2 series khudiram bose picture indian revolutionary zee5 apologize ssj 93
Next Stories
1 गुंजनबरोबर काम केलेल्या महिला पायलटचे पत्र : करणवर खोटी माहिती पसरवण्याचा आरोप तर जान्हवीला दिला सल्ला
2 खुदीराम बोस यांचा फोटो गुन्हेगारांच्या बोर्डावर; नेटकऱ्यांकडून #BoycottZee5 ची मागणी
3 ‘सत्य लवकरच समोर येईल’; सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी दिलजीत दोसांज व्यक्त
Just Now!
X