‘बिग बॉस मराठी २’च्या घरात सध्या कुटुंबीयांसाठी विशेष आठवडा साजरा करण्यात येत आहे. घरातील स्पर्धकांचे कुटुंबीय किंवा जवळचे व्यक्ती त्यांना भेटायला येत आहेत. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये किशोरी शहाणे यांचा मुलगा बॉबी, नेहाचा पती नचिकेत, शिवानीचे वडील आणि हिनाची आई बिग बॉसच्या घरात आली होती. तर आगामी एपिसोड्समध्ये अभिजीत बिचुकलेची पत्नी मुलांसह घरात येणार आहे.
घरातील प्रत्येक सदस्य बऱ्याच दिवसांनी आपल्या मनातील भावना कुटुंबीयांजवळ व्यक्त करणार आहे. बिग बॉसच्या घरात बिचुकलेची आई, पत्नी आणि दोन मुलं येणार आहेत. बिचुकले आणि शिवानी सुर्वे यांच्यातील मैत्री सर्वांनाच ठाऊक आहे. बिचुकलेने घरात खूप आधीच सांगितलं होतं की माझी मुलगी मोठी झाल्यावर शिवानीसारखी झाली पाहिजे. घरात आल्यानंतर बिचुकलेच्या पत्नीने चिमुकल्या मुलीला शिवानीकडे दिलं. शिवानीच्या मांडीवर मुलीला ठेवताच तिला अश्रू अनावर झाले.
आणखी वाचा : ”वीणाला बहीण मानून राखी बांधून घे”; शिव ठाकरे पाळेल का आईची आज्ञा?
शिवानीसारखी मुलगी झाली पाहिजे असं अभिजीतने म्हटल्यामुळेच शिवानीला रडू कोसळल्याचा अंदाज त्याच्या आईने व्यक्त केला. कुटुंबीयांच्या येण्याने घरातील वातावरण आनंदमयी झाले आहे. प्रत्येकाला त्याच्या कुटुंबीयांसोबत, जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे स्पर्धकसुद्धा आनंदी आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 2, 2019 6:27 pm