News Flash

स्लमडॉग मिलेनिअर फेम अभिनेत्री फ्रीडा पिंटो लवकरच अडकणार विवाहबंधनात

ते दोघंही २०१९ मध्ये लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

स्लमडॉग मिलेनिअर फेम अभिनेत्री फ्रीडा पिंटो लवकरच अडकणार विवाहबंधनात

प्रियांका- निकनंतर ‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम अभिनेत्री फ्रीडा पिंटो देखील विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. फ्रीडा गेल्या काही महिन्यांपासून छायाचित्रकार कोरी ट्रैनला डेट करत आहे. फ्रीडानं काही दिवसांपूर्वी कोरीसोबत आपला फोटो शेअर केला होता. ते दोघंही २०१९ मध्ये लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मुळची मुंबईची असलेली फ्रीडा स्लमडॉग मिलेनिअरच्या यशानंतर अमेरिकेत स्थायिक झाली. तिनं अनेक ब्रिटीश आणि अमेरिकनं चित्रपटात काम केलं आहे. फ्रीडा नेहमीच आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलणं टाळते. मात्र आता तिनं उघडपणे कोरीसोबतच्या आपल्या नात्याची कबुली दिली आहे. कोरीसोबतच्या नात्याचा फ्रीडा गांभीर्यानं विचार करत असून पुढील वर्षी ती त्याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. हा छोटेखानी विवाहसोहळा असून त्यात मोजकेच लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती तिच्या जवळच्या व्यक्तीनं दिली आहे.

नुकतीच फ्रीडा लव्ह सोनीया या चित्रपटात दिसली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 5:45 pm

Web Title: according to buzz freida pinto to marry boyfriend cory tran
Next Stories
1 ‘असूरा’च्या माध्यमातून अर्शद वारसीचं वेब विश्वात पदार्पण
2 राहुल महाजन तिसऱ्यांदा बोहल्यावर, कझाकिस्तानी प्रेयसीशी लग्न
3 सुपरहिट मल्याळम ‘अंगमली डायरीज’च्या मराठी रिमेकमध्ये दिसणार भूषण पाटील
Just Now!
X