01 December 2020

News Flash

रानू मंडल पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, गाणार या चित्रपटातील गाणे

या चित्रपटात गाणे गाणार आहेत..

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या पौराणिक मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया या लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट सरोजिनी नायडू यांच्या जीवनावर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात दीपिका या सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान आता या चित्रपटातील एक गाणे रानू मंडल गाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे.

नुकताच दीपिका यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. ‘माझा चित्रपट सरोजिनी या मधील धीरज मिश्रा यांनी लिहिलेले गाणे रानू मंडल गाणार आहेत’ या आशयाचे ट्विट करत दीपिका यांनी माहिती दिली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रानू मंडल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये दीपिका यांनी या चित्रपटाबाबत वक्तव्य केले होते. ‘मला सरोजिनी नायडू या चित्रपटाची ऑफर आली आहे. पण मी अद्याप चित्रपट साइन केलेला नाही. चित्रपटाची कथा ही धीरज मिश्रा लिहिणार असून दिग्दर्शन देखील तेच करणार आहेत. पण लॉकडाउनमुळे मी चित्रपटाची कथा ऐकलेली नाही. लॉकडाउननंतर आम्ही एकत्र भेटू आणि चित्रपटाशी संबंधीत विषयांवर चर्चा करु’ असे दीपिका यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 6:28 pm

Web Title: actress dipika chikhlia movie sarojini song sung by ranu mandal avb 95
Next Stories
1 घटस्फोटित पत्नीचा दावा ठरला खरा; कोट्यवधींच्या चित्रपटातून सुपरस्टारला केलं बाहेर
2 ‘यू गॉट मॅजिक विथ नील माधव’सह जादुई प्रवासाचा आनंद घेण्‍यास सज्ज व्हा!
3 ‘लक्ष्मी’ चित्रपट पाहता अक्षय ऐवजी शरद केळकरवर नेटकरी फिदा
Just Now!
X