महिला विश्वचषकाची फायनल मॅच इंग्लंडमध्ये रंगली आहे. हा विश्वचषक जर का महिलांच्या टीम इंडियानं जिंकला तर बिर्याणी पार्टी देईन असं ट्विट हुमा कुरेशीनं केलं आहे. महिला टीम इंडियानं आजवर खूप चांगली कामगिरी केली आहे आणि मला विश्वास आहे की विश्वचषकही हीच टीम जिंकणार आहे. ट्विटर अकाऊंटवरून हुमा कुरेशीनं टीम इंडियाला जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जा मुलींनो जिंका वर्ल्डकप मी तुम्हाला बिर्याणी खाऊ घालते असा ट्विट हुमा कुरेशीनं केला आहे. टीम इंडियाच्या महिला टीमची कॅप्टन मिताली राजला टॅग करत हुमा कुरेशीनं सगळ्या महिला टीम इंडियाला पार्टी देणार असल्याचं जाहीर करून टाकलं आहे.
झुलन गोस्वामीनंही खूप सुंदर खेळ केला असल्याचं म्हणत हुमा कुरेशीनं तिचंही कौतुक केलं आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला विश्वचषकाचा महामुकाबला आज इंग्लंडमध्ये रंगतो आहे. टॉस जिंकून इंग्लंडनं सगळ्यात आधी फलंदाजी घेतली. मात्र भारतीय महिला टीमच्या गोलदाजांपुढे त्यांचा फारसा टीकाव लागला नाही. इंग्लंडच्या टीमनं २२८ रन केले असून भारतापुढे विजयासाठी २२९ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2017 9:18 pm