22 June 2018

News Flash

जया बच्चन यांनी सांगितलं बिग बींच्या आजारामागचं कारण

...म्हणून त्यांना हा त्रास झाला

अमिताभ बच्चन, जया बच्चन

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान बिग बी अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त कळतात कलाविश्वात अनेकांनीच त्यांच्याविषयी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचं जोधपूरमध्ये चित्रीकरण सुरु असतेवेळीच त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या तपासणीसाठी मुंबईहून डॉक्टरांची एक टीम खासगी विमानाने जोधपूरला पाठवण्यात आली होती. ज्यानंतर त्या टीमने बिग बींवर उपचार केल्याची माहिती समोर आली.

महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत एकाएकी असा बिघाड झाल्यामुळे चाहत्यांनीही त्यांच्याविषयी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. पण, त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी बिग बींची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगत अनेकांनाच दिलासा दिला. दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याविषयीची माहिती दिली. ‘अमितजींच्या प्रकृतीत आता सुधारणा आहे. ते बरे आहेत. त्यांना पाठ आणि मानदुखींमुळे हा त्रास झाला होता. चित्रपटासाठी त्यांना देण्यात आलेल्या कपड्यांचे वजन जास्त असल्यामुळेच त्यांना हा त्रास झाला. इतर कोणतेही गंभीर कारण नसून, त्यांची प्रकृती उत्तम आहे’, असं त्या म्हणाल्या.

#AmitabhBachchan's look from #ThugsOfHindostan is EPIC

A post shared by Filmfare (@filmfare) on

वाचा : अठराव्या वर्षीच तिने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘हा’ अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीसुद्धा बिग बींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली. सध्याच्या घडीला ‘ठग्स…’ची टीम जोधपूरमध्ये असल्यामुळे राजे यांनी जोधपूर प्रशासनाला उद्देशून बिग बींना पुरवल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांमध्ये कोणतीही हेळसांड न होऊ देण्याची विचारणा करणारे एक पत्रक त्यांच्या कार्यालयाकडून जारी केले आहे. सध्या त्या कांचीपुरम आणि आंध्रप्रदेश दौऱ्यावर असल्या तरीही आपल्या राज्यात येणाऱ्या कलाकारांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागू नये, याकडे त्यांनी जातीने लक्ष दिलं आहे.

First Published on March 14, 2018 8:33 am

Web Title: actress jaya bachchan reveals the cause behind bollywood actor amitabh bachchans ill health heavy costumes thugs of hindostan