28 October 2020

News Flash

आलियाच्या आईसोबतही नीतू सिंगचे जुळले सूत

काही दिवसांपूर्वीच रणबीरने त्याच्या आणि आलियाच्या रिलेशनशिपविषयीची अधिकृत माहिती दिली होती.

आलिया भट्ट, नीतू सिंग, सोनी राजदान, alia neetu soni

रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या नात्याविषयीच्या बऱ्याच चर्चांना कलाविश्वात उधाण आलं आहे. सध्या ते दोघंही बल्गेरियामध्ये ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रवाना झाले आहेत. असं असलं तरीही रणबीरची आई म्हणजेच अभिनेत्री नीतू सिंग यांनी आलियाप्रती असलेलं प्रेम व्यक्त करणं थांबवलेलं नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून आलिया भट्ट आणि नीतू सिंग यांचं नातं सर्वांसमोर आलं आहे. किंबहुना आलियाच्या मित्रपरिवाराशी आणि तिच्या आईशीसुद्धा नीतू एक खास नातं बनवू पाहात आहेत.

आलियाने काही दिवसांपूर्वीच तिची मैत्रीण आणि सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट पुनीत सैनी हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट केली, ज्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नीतू सिंग यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या कमेंटला आलियानेही उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.

फक्त आलियाच नव्हे तर, तिच्या आईसोबतचही नीतू सिंग यांचं एक खास नातं आहे. आलियाची आई, सोनी राजदान यांच्या सोशल मीडिया पोस्टवरही नीतू यांच्या कमेंट पाहायला मिळतात. इतकत नव्हे, तर सोनी राजदानसुद्धा नीतू कपूर यांच्या फोटोंवर पोस्ट करतात. त्यामुळे आता फक्त आलियाच नव्हे तर तिच्या आईसोबतही नीतू सिंग यांचे चांगलेच सूत जुळून आले आहेत, असं म्हणायला हरकत नाही. काही दिवसांपूर्वीच रणबीरने त्याच्या आणि आलियाच्या रिलेशनशिपविषयीची अधिकृत माहिती दिली होती. तेव्हापासूनच कलाविश्वात या नव्या सेलिब्रिटी कपलच्या नात्याविषयी अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 11:15 am

Web Title: actress neetu kapoors love for ranbirs bae alia bhatt spills over to her mom soni razdan
Next Stories
1 जान्हवी म्हणते, माझी साराशी स्पर्धा नाहीच!
2 बिग बींची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात, बँक कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप
3 ते ही म्हणत आहेत.. ‘सब’कुछ पु. ल.
Just Now!
X