सध्या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो इंडियन आयडलचे १२ वे पर्व सुरु झाले आहे. नुकताच सोनी वाहिनीने इंडियन आयडलच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायण हा परिक्षक नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमियासोबत मजामस्ती करताना दिसतो. दरम्यान आदित्य नेहाला, ‘तिला माझं सुख बघवत नाही’ असे बोलताना दिसत आहे.
सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आदित्य नेहाशी बोलत असतो. ‘जिला मी माझ्या लग्नात बोलावले होते पण तिला माझं सुख बघवत नाही. जळकी परिक्षक नेहा कक्कर’ असे आदित्य बोलतो. आदित्यचे बोलणे ऐकून नेहा, विशाल आणि हिमेशला हसू अनावर झाले आहे.
View this post on Instagram
आदित्यच बोलणे ऐकून नेहादेखील आदित्यला ‘हा. तू माझ्या लग्नात कुठे होतास? आला नाहीस. तू आलास का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर आदित्यने शाहरुख खानच्या स्टाइलमध्ये उत्तर दिले आहे. ‘जसं की शाहरुखने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटात म्हटले होते.. मैं नहीं आऊंगा’ असे आदित्य मजेशीर अंदाजात बोलताना दिसतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 20, 2020 12:21 pm