26 February 2021

News Flash

बार्बरा मोरीनंतर या परदेशी सौंदर्यवतीमुळे हृतिक चर्चेत..

या दोघांनीही जाहिरातीमध्ये एकत्र काम केले होते.

छाया सौजन्य- सोशल मीडिया

अभिनेता हृतिक रोशन त्याच्या चित्रपटातील पात्रांसोबतच आणखी एका कारणामुळे चर्चेत असतो. ते कारण म्हणजे सहकलाकारांना त्याची होणारी मदत. हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये हृतिकने भारतीय अभिनेत्रींसोबतच काही परदेशी अभिनेत्रींनाही तितक्याच सहजतेनं त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी दिली. ‘काइट्स’ या चित्रपटातून हृतिक आणि बार्बरा मोरी ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. बार्बरा-हृतिकची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहता त्यांच्या नात्याला अफेअरचे नावही देण्यात आले होते. अर्थात त्या सर्व अफवा असल्याचे सांगत नंतर त्याविषयाला फारशी हवा देण्यात आली नाही.

बार्बरा या परदेशी सौंदर्यवतीला भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये नाव मिळवून देणाऱ्या हृतिकने पुन्हा एकदा आणखी एका परदेशी मॉडेल-अभिनेत्रीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सध्या हृतिक अँजेला क्रिसलिंझस्की या अभिनेत्रीचे अभिनय कौशल्य सुधारण्यासाठी तिला मदत करत आहे. हृतिक आणि अँजेलाने आतापर्यंत दोन जाहिरातींमध्ये एकत्र काम केले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अँजेलाने हृतिकसोबत काम करतानाचा तिचा अनुभव शेअर केला आहे. ‘माझ्या पहिल्या जाहिरातीच्या वेळी हृतिकसोबत काम करत असताना कोणत्याही नवोदित कलाकाराप्रमाणेच माझेही हृतिकवर क्रश होते. त्याला जेव्हा मी स्पॅनिश आहे असे कळले त्यावेळी त्याने स्पेनविषयी माझ्याशी बऱ्याच गप्पा मारल्या आणि मला अभिनयातील काही बारकावेही समजावून सांगितले.’ असे अँजेला म्हणाली.

२०१६ मध्ये हृतिसोबत काम करण्याचा पुन्हा योग आला त्यावेळी मात्र हा इतका मोठा अभिनेता मला ओळखही देणार नाही असे अँजेलिनाला वाटले होते. ‘मला तर वाटले होते की तो (हृतिक) मला विसरलाही असेल. कारण, आजवर त्याने माझ्यासारख्या बऱ्याच मॉडेल्ससोबत काम केले असेल. पण, त्याने मला स्वत:हून बोलावून घेतले आणि काही वर्षांपूर्वी आमच्यामध्ये झालेल्या संभाषणाची आठवण करुन दिली. इतकेच नव्हे तर मोठ्या विनोदी अंदाजात त्याने माझ्या डोळ्यांचा रंग खरा आहे का…? असेही विचारले.’, असे अँजेलिनाने सांगितले.

दाक्षिणात्य चित्रपट ‘साइज झिरो’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अँजेला सध्या तिच्या बॉलिवूड करिअरविषयी चिंताग्रस्त आहे. याविषयीच हृतिकला कळले तेव्हा त्याने तिला पाठिंबा दिला. सोबतच त्याने अँजेलाला तिच्या हिंदी भाषेवर आणि शब्दांच्या उच्चारांवर प्रभुत्व मिळवण्यासाठीचे प्रयत्न करण्याचा सल्लाही दिला.  हृतिकच्या या अशा वागण्यामुळे तोसुद्धा अनेक नवोदित कलाकारांचा आवडता अभिनेता आणि मार्गदर्शक ठरत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 1:08 pm

Web Title: after barbaba mori bollywood actor hrithik roshan turned mentor for angela krislinzki
Next Stories
1 Sarabhai vs Sarabhai: ‘साराभाई’ मधले हे बदलं तुम्हालाही नक्की आवडतील
2 ऐश्वर्याविना बच्चन कुटुंबाची शाही लग्नाला उपस्थिती
3 ऋषिकेशमध्ये साधुसंतांसोबत दीपिकाने केली गंगा आरती
Just Now!
X