News Flash

शिल्पा शिंदेनंतर दुसरी अंगुरी भाभीसुद्धा शो सोडणार?

निर्मात्यांसमोर पुन्हा नवा चेहरा शोधण्याचे आव्हान

शुभांगी अत्रे, शिल्पा शिंदे

टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘भाभीजी घर पर है’मधील नवीन भाभीजी म्हणजेच अभिनेत्री शुभांगी अत्रेसुद्धा मालिका सोडून जाणार असल्याची चर्चा आहे. मालिकेच्या टीमने आता तिच्या जागी नवी अभिनेत्री शोधायला सुरूवात केलेय. यापूर्वी शिल्पा शिंदे हिने अंगुरी भाभीची भूमिका साकारली होती. मात्र, निर्मात्यांसोबत वाद झाल्यानंतर ती या मालिकेतून बाहेर पडली होती.

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार शुभांगी अत्रे राजकारणात प्रवेश करण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी ती एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमातसुद्धा सहभागी झाली होती. त्यावेळी शुभांगीला राजकीय क्षेत्रात काम करायला आवडेल का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी अजूनही याबाबत संभ्रमात असल्याचे तिने सांगितले होते. मात्र, या सगळ्या घडामोडींनंतर शुभांगी मालिका सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

वाचा : चित्रपट न पाहताच राजकीय नेते विरोध कसा करू शकतात; ‘पद्मावती’वरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले

शिल्पाने मालिका सोडल्यानंतर तिच्या जागी नवीन अभिनेत्रीला शोधणं निर्मात्यांसाठी कठीण काम होतं. शिल्पा शिंदेंने अंगुरी भाभी म्हणून प्रेक्षकांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यामुळे मालिकेचा टीआरपीसुद्धा वधारला होता. त्यानंतर शुभांगीनेही तिच्या परीने या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांनीही तिला अंगुरी भाभीच्या रूपात स्वीकारले होते. मात्र, आता शुभांगीही मालिका सोडून जात असल्याने निर्मात्यांसमोर पुन्हा नवा चेहरा शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 1:07 pm

Web Title: after shilpa shinde bhabhi ji ghar par hai actress shubhangi atre to quit show
Next Stories
1 चित्रपट न पाहताच राजकीय नेते विरोध कसा करू शकतात; ‘पद्मावती’वरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले
2 प्रिन्स हॅरी- मेगनला प्रियांका चोप्राने दिल्या शुभेच्छा
3 दीपिकाला कपिलचा पाठिंबा
Just Now!
X