News Flash

‘पद्मावती’ चित्रपटात दीपिकाला टक्कर देण्यास ऐश्वर्या सज्ज

ऐश्वर्यावर चित्रित होणाऱ्या 'पद्मावती'मधील गाण्यासाठी भन्साळी खास लक्ष देताना दिसत आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या राय

संजल लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनात बनणाऱ्या ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. एका ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि अभिनेता शाहिद कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या आघाडीच्या कलाकारांच्या यादीत आता सौंदर्यवती ऐश्वर्याने एन्ट्री घेतली आहे. पद्मावती चित्रपटात ऐश्वर्या रायच्या विशेष भूमिकेसाठी खास चित्रित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. या चित्रपटातील एका गाण्यामध्ये ऐश्वर्या दिसणार असून ऐश्वर्याच्या मुखातून संवाद फेक देखील पाहायला मिळणार आहे.

ऐश्वर्या रायवर चित्रित करण्यात येणाऱ्या गाण्यासाठी भन्साळी यांनी खास लक्ष घातले असून ‘देवदास’ चित्रपटातील ऐश्वर्या- माधूरी आणि ‘बाजीराव मस्तानी’मधील प्रियांका-दीपिका यांच्या जुगलबंदीपेक्षा वेगळा बाज देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ऐश्वर्यावर चित्रित करण्यात येणाऱ्या गाण्यातून वास्तविक दर्शन घडविण्यासाठी भन्साळी राजस्थानची राणी पद्मावतीच्या काळातील लोकनृत्याचा बारकाईने आभ्यास करत आहेत. या गाण्याच्या निर्मितीसाठी विशेष टीम कार्यरत आहे. ही विशेष टीम ऐश्वर्याचा मेकअप, नृत्य, सेट आणि संगीतयवर विशेष लक्ष देत आहे.  ऐश्वर्यावर चित्रित होणारे खास गाणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चित्रित करण्यात येणार आहे.भन्साळी यांच्या ‘रामलीला’ चित्रपटामध्ये आयटम सॉगमध्ये थिरकणारी प्रियांका चोप्रा ‘पद्मावती’साठी उत्सुक होती. मात्र ती सध्या हॉलिवू़डमधील चित्रिकरणात व्यग्र असल्यामुळे  तिची या चित्रपटामध्ये वर्णी लागू शकली नाही अशी चर्चा सध्या बॉलिवूड वर्तूळात रंगली आहे.

‘पद्मावती’ या ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या चित्रपटामध्ये अल्लाउद्दीन खिलजी, राणी पद्मावती, मेवाडचे राणा रतन सिंग यांच्या व्यक्तिरेखा साकारण्यात येणार आहेत. त्या काळची मेवाडची समृद्ध संस्कृती पाहता त्यावर जास्त लक्ष केंद्रित येत आहे. ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटामध्ये ज्या प्रकारची भव्यता पाहायला मिळाली होती त्याचप्रकारची भव्यता किंबहुना त्याहीपेक्षा जास्त भव्य आणि नेत्रदीपक देखावे ‘पद्मावती’ या चित्रपटामध्ये पाहता येणार आहेत. या चित्रपटामध्ये दीपिकासह अभिनेता रणवीर सिंग आणि शाहिद कपूरही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. रणवीर या चित्रपटातून अलाउद्दीन खिल्जीच्या रुपात झळकणार आहे. त्यामुळे भन्साळींच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाकडे अनेकांचेच लक्ष लागून राहिले आहे. संजय लीला भन्साली यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या गाण्याने सुरुवात करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 6:40 pm

Web Title: aishwarya rai bachchan sanjay leela bhansali padmavati deepika padukone
Next Stories
1 ‘या’ अभिनेत्याच्या पत्नीने पोटगीसाठी मागितली ३० कोटी डॉलरची गडगंज रक्कम?
2 मीराने केला शाहीदसोबतच्या पहिल्या भेटीचा खुलासा
3 ‘या’ अभिनेत्रीसाठी हिमेश रेशमियाने घेतला घटस्फोट?
Just Now!
X