‘अजूनही बरसात आहे’ ही सोनी मराठी वाहिनीवरची मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. मुक्ता आणि उमेश यांची जोडी प्रेक्षकांना आवडत असून या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळतं आहे. या जोडीला छोट्या पडद्यावर पाहायला प्रेक्षकांना आवडतंय. मालिकेत मीरा आणि आदिराज यांचे काही फ्लॅशबॅक सीन्सही पाहायला मिळत आहेत.

‘अजूनही बरसात आहे’ मालिकेत उमेश आणि मुक्ता ही दोघं आपल्यापेक्षा १० वर्षं लहान वयाची भूमिका साकरताना दिसत आहेत. आपल्या पेक्षा लहान वयाची भूमिका साकारणं आव्हात्मक नक्कीच आहे. उमेशला तरुण दिसण्यासाठी क्लीन शेव करावं लागतं आणि त्यापुढचे काही दिवस तो वर्तमान काळातलं चित्रीकरण करू शकत नाही.

मुक्ताचाही शॉर्ट हेअर लूक आणि शर्ट-जीन्स असा पेहराव फ्लॅशबॅक एपिसोड्समध्ये पाहायला मिळतो. या सर्व चित्रीकरणासाठी संपूर्ण टीमचा कस पणाला लागतो आणि उत्तम टीमवर्कमुळेच हे इतक्या छान प्रकारे होऊ शकतं. मुक्ता आणि उमेश म्हणजेच आदिराज आणि मीरा या जोडीला प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळतं आहे.