News Flash

…म्हणून वयाची ४० उलटल्यानंतरही अक्षय खन्नाने केलं नाही लग्न

एका मुलाखती दरम्यान अक्षयने हा खुलासा केला आहे

बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाचा नुकताच ‘सेक्शन 375’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना पाहायला मिळत आहे. अक्षय खन्नाने या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील केले होते. दरम्यान त्याने एका मुलाखतीमध्ये त्याच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

बॉलिवूडमध्ये आता पर्यंत अक्षय खान्नाचे नाव कोणत्याही अभिनेत्रीसोबत जोडण्यात आलेले नाही किंवा अक्षय खन्ना कोणत्या अभिनेत्रीसोबत फिरतानाही दिसला नाही. ४० वर्षे उलटून गेली आहेत तरीही अक्षयने लग्न केलेले नाही. त्यामागे कोणती अभिनेत्री आहे का? अक्षयच्या लग्नाला घरातल्यांचा विरोध होता का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. आता चाहत्यांच्या सर्व प्रश्नांना खुद्द अक्षयने उत्तर दिले आहे.

एका मुलाखतीमध्ये अक्षयने लग्न का केले नाही याचा खुलासा केला. ‘मी कोणाला कमिटमेट देण्यासाठी अद्याप तयार नाही. लग्नानंतर सगळ्याच गोष्टी बदलतात. तुम्हाला एखादी गोष्ट करण्यापूर्वी त्या गोष्टीचा खूप विचार करावा लागतो. तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते’ असे अक्षय म्हणाला.

‘लग्नानंतर मुले झाली की पुन्हा आणखी एक जवाबदारी वाढते. तुम्हाला त्यांना जास्त महत्व द्यावे लागते. इतर गोष्टींपेक्षा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी वेळ काढावा लागतो. त्यांची जबाबदारी हे खूप मोठे काम आहे आणि त्यासाठी मी अद्याप तयार नाही. म्हणून मी भविष्यात पुढे लग्नाचा विचार केलेला नाही’ असे अक्षय म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 9:12 am

Web Title: akshay khanna talks about his marriage avb 95
Next Stories
1 KBC: एक कोटी जिंकणाऱ्या बबिता यांना बिग बींकडून मिळाली ‘ही’ खास भेट
2 KBC : ..म्हणून अचूक उत्तर देऊनही बबिता ताडे जिंकू शकल्या नाहीत ७ कोटी रुपये
3 सलमानने किसिंग सीनमुळे सोडलेल्या ‘इंशाअल्लाह’वर आलियाने सोडले मौन
Just Now!
X