News Flash

अन् अक्षयने सर्वांसमोर ट्विंकलने लिहिलेलं ‘विचित्र’ पत्र वाचलं

अक्षय हा पुरस्कार स्वीकारताना ट्विंकल तेथे उपस्थित नव्हती

अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार काही दिवसांपूर्वी ‘वोग ब्युटी पुरस्कार २०१७’ सोहळ्याला गेला होता. यावेळी त्याच्यासोबत ट्विंकल खन्ना नव्हती. पण आपल्या अनुपस्थितीतही आपली जाणीव कशी करुन द्यावी हे ट्विंकलकडून शिकावं. करिश्मा कपूरने वोग ब्युटी पुरस्कार देऊन अक्षयचा गौरव केला. आता पुरस्कार स्वीकारल्यानंतर छोटेखानी भाषण तर द्यावं लागणारच ना… अक्षयने भाषणाला सुरूवात करत, ‘माझ्या बायकोने मला भाषण लिहून दिलं आहे ते तिने वाचायला सांगितलं आहे. त्यामुळे तुमची इच्छा असो किंवा नसो पण मला हे भाषण वाचून दाखवावंच लागेल,’ असं तो म्हणाला.

‘या पुरस्कारासाठी मी वोगचे आभार मानतो. तसेच मी माझ्या ट्रेनरचे आभार मानतो ज्याला मी सर्वाधिक मानधन देतो आणि माझ्यासाठी जेवण करणाऱ्या त्या आचाऱ्याचेही आभार मानतो ज्याला मी फार कमी मानधन देतो. यांच्यामुळेच मी सुंदर आणि सुदृढ आहे. याचबरोबर मी माझ्या बायकोचेही आभार मानतो. कारण नऊ महिने माझं बाळ माझ्या पोटात नव्हतं, त्यामुळे माझी फिगर बिघडली नाही. तिने फार तडजोडी केल्या, तिने मला दोन सुंदर मुलं दिली. इथून निघण्यापूर्वी मी माझ्या सुंदर आणि हुशार बायकोचे आभार मानू इच्छितो,’ असं अनोखं भाषण ट्विंकलने अक्षयला लिहून दिलं होतं. तिचं हे पत्र वाचताना उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.

अक्षयला ‘मॅन ऑफ दी डिकेड’चा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना ट्विंकल तेथे उपस्थित नव्हती. त्यामुळे तिची उणीव भासू नये याची पूर्ण काळजी अक्षयने घेतली असेच म्हणावे लागेल. अक्षयच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, या आठवड्यात अक्षयचा ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. तसेच ‘गोल्ड’ सिनेमाचे चित्रीकरणही त्याने सुरू केले आहे. या सिनेमात त्याच्यासोबत टिव्ही अभिनेत्री मौनी रॉयही दिसणार आहे. मौनी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 3:02 pm

Web Title: akshay kumar beautiful man of the decade award received by karisma kapoor akshay gave a speech written by wife twinkle khanna
Next Stories
1 २४ तासांत २४ शौचालयांचं उदघाटन, ‘टॉयलेट…’च्या प्रमोशनचा अनोखा फंडा
2 असा होणार ‘द कपिल शर्मा शो’चा कायापालट?
3 सुषमाजी मला वाचवा, ‘जब हॅरी मेट सेजल’ बघायला गेलेल्या प्रेक्षकाचं ट्विट व्हायरल
Just Now!
X