28 February 2021

News Flash

पुन्हा दाक्षिणात्य चित्रपटात अक्षय साकारणार खलनायक

या चित्रपटात कमल हसनदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

अक्षय कुमार, akshay kumar

बॉलिवूडचा खिलाडी, अभिनेता अक्षय कुमार गेल्या वर्षापासून एकाहून एक सुपरहिट चित्रपट देत बॉलिवूड गाजवत आहे. ‘पॅडमॅन’ या चित्रपटापासून त्याची जी चर्चा सुरु झाली आहे, ती काही केल्या थांबत नाही. त्याचा ‘केसरी’ हा चित्रपटही आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानंतर तो चित्रपट दिग्दर्शक एस.शंकर यांचा आगामी चित्रपटात झळकणार आहे. मात्र या आगामी चित्रपटामध्ये तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

एस.शंकर यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘इंडियन २’ असं असून हा चित्रपट १९९४ सालच्या ‘इंडियन’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन मुख्य भूमिकेमध्ये होते. ‘इंडियन २’ मध्येदेखील कमल हसन यांची मुख्य भूमिका असून अक्षय खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

‘इंडियन २’ हा अक्षयचा दुसरा दाक्षिणात्य चित्रपट आहे. यापूर्वी अक्षयने एस.शंकर यांच्या ‘२.०’ या दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं होतं. विशेष म्हणजे या चित्रपटातदेखील तो खलनायकाच्याच भूमिकेत झळकला होता. या चित्रपटासाठी प्रथम दिग्दर्शकांनी अजय देवगणला ऑफर दिली होती. मात्र काही कारणास्तव अजयने चित्रपटासाठी नकार दिला. या काळातच ‘२.०’ चं चित्रीकरण सुरु होतं. चित्रपटाच्या सेटवर अक्षय आणि शंकर यांच्यात चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर शंकर यांनी अक्षयला ‘इंडियन २’ चित्रपटात काम करण्याविषयी विचारलं.

दरम्यान, अक्षयने आतापर्यंत अभिनेता म्हणून चाहत्यांची मन जिंकली आहेत. मात्र आता खलनायकाच्या भूमिकेतही तो प्रेक्षकांना आवडत आहे, असं एकंदरीत दिसून येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 2:35 pm

Web Title: akshay kumar kamal hassan new south movie indian 2
Next Stories
1 ‘बाळासाहेब ठाकरेंना करायची होती तुमची हत्या’, यावर सोनू निगमने दिली ही प्रतिक्रिया
2 पूर्वकल्पना न देता ‘पती, पत्नी और वो’च्या रिमेकमधून तापसीची गच्छंती
3 Video : ‘लकी’मधील ‘कोपचा’ गाण्यावर जितेंद्र यांचा हटके डान्स
Just Now!
X