28 September 2020

News Flash

आलिया भट्टच्या ‘सडक २’ला IMDb वर मिळाली सर्वांत कमी रेटिंग

चित्रपटावर टीकांचा भडीमार

अभिनेत्री आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि पूजा भट्ट यांची मुख्य भूमिका असलेला ‘सडक २’ हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. परंतु या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षकांकडून सर्वांत वाईट प्रतिक्रिया मिळत आहेत. इतकंच नव्हे तर IMDb वेबसाइटवर या चित्रपटाला सर्वांत कमी रेटिंग मिळाली आहे. ‘सडक २’च्या ट्रेलरलाही युट्यूबवर लाइक्सपेक्षा डिसलाइक्स फार होते. २०२० या वर्षातला हा अत्यंत वाईट चित्रपट असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक-समीक्षकांकडून येत आहे.

महेश भट्ट यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा व त्याचं दिग्दर्शन पूर्णपणे अपयशी ठरल्याचं म्हटलं जात आहे. त्याचप्रमाणे त्यातील भूमिकांना कोणताच अर्थ नसल्याची टिप्पणी समीक्षकांनी दिली आहे.

आणखी वाचा : ‘ड्रग्सविषयीचे चॅट मीच टाइप केले होते’; रियाची कबुली  

‘सडक २’चा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी त्याच्याविरोधात एक ऑनलाइन मोहिमच सुरू केली होती. त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरवर डिसलाइक्सचा भडीमार करण्यात आला. पण आता चित्रपटसुद्धा पाहण्यालायक नसल्याची टीका प्रेक्षक-समीक्षकांकडून होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2020 5:25 pm

Web Title: alia bhatt sadak 2 is the worst rated film on imdb ssv 92
Next Stories
1 मुंबई पोलीस रियाला पुरवणार सुरक्षा
2 मराठी प्रेक्षकांसाठी पर्वणी; ‘प्लॅनेट मराठी’वर पाहता येणार १० नव्या-कोऱ्या वेबसीरिज
3 ‘सुशांत ड्रग्स घेत असता तर…’ एक्स असिस्टंटने केला खुलासा
Just Now!
X