बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. यावेळी आलिया तिच्या एका थ्रोबॅक व्हिडीओमुळे चर्चेच आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आपले हसू रोखता येणार नाही.
सर्वाधिक वाचकपसंती – “ही माणसं केवळ मार खाण्यास पात्र”; दारुच्या दुकानांवर संतापला अभिनेता
View this post on Instagram
हा व्हिडीओ एका पुरस्कार सोहळ्यातील आहे. अभिनेता अपारशक्ति खुराना आणि त्याचा आयुषमान खुराना या सोहळ्याचे होस्ट होते. दरम्यान अपारशक्तिने आलियाला एक गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला. “मेकअप केल्याशिवाय कुठल्या कलाकाराला तू बिग बॉसच्या घरात पाठवशील?” यावर आलिया म्हणाली तुला आणि तुझ्या भावाला मेकअप केल्याशिवाय मी बिग बॉसच्या घरात पाठवेन. आलियाने तिची फिरकी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपारशक्तिचीच फिरकी घेतली गेली. यामुळे सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.
सोशल मीडियावर सध्या थ्रोबॅक व्हिडीओचा ट्रेंड सुरु आहे. नेटकरी आपले जुने फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट पुन्हा एकदा पोस्ट करुन जुन्या आठवणींना नव्याने उजाळा देत आहेत. या पार्श्वभूमीवर आलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी आलिया भट्टची खिल्ली देखील उडवली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 6, 2020 5:32 pm