News Flash

अमिताभ यांच्या वाढदिवसासाठी बच्चन कुटुंबियांचा खास बेत

बॉलीवूड इंडस्ट्रीच्या लाडक्या महानायकाचा ७२वा वाढदिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. 'बीग बीं'च्या चाहत्यांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील त्यांच्या वाढदिवसासाठी अनेक खास बेत आखले आहेत.

| October 11, 2014 11:31 am

बॉलीवूड इंडस्ट्रीच्या लाडक्या महानायकाचा ७२वा वाढदिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. ‘बीग बीं’च्या चाहत्यांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबियांनीदेखील त्यांच्या वाढदिवसासाठी अनेक खास बेत आखले आहेत. अमिताभ यांची सून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिनेसुद्धा ‘बीग बीं’च्या वाढदिवसाचे ग्रँड सेलिब्रेशन करायचे ठरवले आहे. त्यासाठी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये अमिताभ यांच्यासाठी सरप्राइज पार्टीचे आयोजन केल्याचे कळते. या पार्टीसाठी बच्चन कुटुंबीयांचा मित्र परिवाराला आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी बिग बींची प्रसिद्ध गाणी ऐकवली जाणार आहेत. तसेच या पार्टीतील जेवणात बिग बींच्या आवडीचे पदार्थ ठेवण्यात येणार आहेत.
अलिकडेच, एका इव्हेंटमध्ये अभिषेकला विचारण्यात आले होते, की बिग बींच्या बर्थडेचे काय प्लानिंग आहे? त्याने सांगितले, ‘मी तुम्हाला आमचे प्लॅनिंग का सांगू? हा त्यांच्या चाहत्यांसाठी खूप मोठा दिवस आहे. मीसुध्दा माझ्या वडिलांचा खूप मोठा चाहता असल्याचे सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2014 11:31 am

Web Title: amitabh bacchan birthday planning through country
Next Stories
1 महानायकाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा…
2 गुगल ‘डुडल’वर आर. के. नारायण!
3 अ‍ॅक्टिव्ह जावेद अख्तर!
Just Now!
X