21 February 2019

News Flash

Video : ….म्हणून बिग बींना वाढदिवशी कोसळलं रडू

'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर त्यांना खास गिफ्ट मिळालं.

अमिताभ बच्चन, amitabh bachchan

बॉलिवूडचा बादशहा अर्थात अभिनेता अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी (११ ऑक्टोबर) ७६ वा वाढदिवस साजरा केला. सर्वच स्तरांमधून बिग बींवर शुभेच्छांचा आणि भेटवस्तूंचा वर्षाव करण्यात आला. परंतु ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर त्यांना मिळालेलं गिफ्ट हे सर्वात खास असल्याचं दिसून आलं.

केबीसीच्या मंचावर अमिताभ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना भेटवस्तू म्हणून त्यांच्या आईच्या आवाजातील एक रेकॉर्डींग ऐकविण्यात आली. आईचा आवाज ऐकताच बिग बींच्या डोळ्यात अश्रू तरळलं. विशेष म्हणजे हा क्षण बिग बींसाठी प्रचंड भावनिक असल्याचं दिसून आले. सध्या अमिताभ यांच्या या भावनिक क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असून तो प्रचंड व्हायरल होत आहे.

रेकॉर्डींग सुरु होताच बिग बींनी आईचा आवाज ओळखला आणि त्यांनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला. ‘माझ्या आईचा आवाज ऐकून मी नि:शब्द झालो आहे. यापूर्वी आईला असं गातांना कधीच पाहिलं नव्हतं. प्रचंड आनंद होत आहे’, असं बिग बी म्हणाले.

दरम्यान,  बिग बींना वाढदिवासानिमित्त मिळालेलं हे सर्वात मोठं आणि खास गिफ्ट असल्याचं सांगण्यात येत आहे. काल दिवसभरामध्ये (११ ऑक्टोबर) अमिताभ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर झाला. त्यामुळे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छुकांचे आभार मानले आहेत.

First Published on October 12, 2018 2:12 pm

Web Title: amitabh bachchan reveals his secrets on his birthday in kbc