19 February 2019

News Flash

अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती खुद्द अमिताभ यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

| August 31, 2015 12:46 pm

अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, टेक्नॉलॉजीच्या सध्याच्या जमान्यात कोणावरही आरोप करणे अगदी सहजसोपे असते. लोकांना वस्तुस्थिती काय आहे, हे फारसे जाणून घ्यायचे नसते.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती खुद्द अमिताभ यांनी ट्विटद्वारे दिली आहे. बिग बी यांच्या नकळत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून काही आक्षेपार्ह संकेतस्थळांना फॉलो केले गेले आहे. माझे ट्विटर अकाऊंट हॅक झाले असून काही आक्षेपार्ह संकेतस्थळांना हॅकरने फॉलो केले आहे. ज्याने हे कृत्य केले आहे, त्याने दुसरे काहीतरी करावे, मला याची गरज नाही, असे अमिताभ यांनी हॅकरला सुनावले आहे.

ट्विटरकरांमध्ये अमिताभ यांचे ट्विटर अकाऊंट प्रचंड लोकप्रिय आहे. ट्विटर अकाऊंटवर अमिताभ यांचे लाखो फॉलोव्हर्स आहेत. अमिताभ ट्विटरवर सक्रिय असतात. दिवसभरातील घडामोडी आणि आठवणी बिग बी ट्विटर अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांसाठी शेअर करीत असतात. तसेच अमिताभ यांनी अनेकवेळा ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद देखील साधला आहे. याशिवाय, ताज्या घडामोडी आणि संवदेनशील विषयांवर देखील अमिताभ आपले व्यक्तिगत मत ट्विटद्वारे व्यक्त करीत असतात.

First Published on August 31, 2015 12:46 pm

Web Title: amitabh bachchan twitter account hacked